Maharashtra Rain : राज्यात पावसानं घेतला 89 जणांचा बळी, 181 जनावरंही दगावली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Rain Latest Updates

राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत.

Maharashtra Rain : राज्यात पावसानं घेतला 89 जणांचा बळी, 181 जनावरंही दगावली

Maharashtra Rain Latest Updates : राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक गावं पाण्याखाली गेली आहेत. अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यानं गावांचा संपर्क तुटलाय. काही घाटांमध्ये दरडी कोसळण्याच्या, घरांचं नुकसान होण्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत राज्यात पावसानं 89 जणांचा मृत्यू झाला असून चार जण अजूनही बेपत्ता आहेत. तर, 181 जनावरांचाही मृत्यू झालाय.

हेही वाचा: केंद्रीय नेतृत्वानं देवेंद्र फडणवीसांचा पोपट केलाय; राऊतांची टीका

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात 27 जिल्ह्यांना पावसाचा फटका बसलाय. या जिल्ह्यांतील 250 हून अधिक गावांमध्ये नद्यांचं पाणी घुसलं आहे. मागील चोवीस तासांत पाच जणांचा बळी गेला आहे. त्यामध्ये नागपुरात तिघं जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर, पालघरमध्ये दरड कोसळून एका मृत्यू झाला. रायगडमध्येही एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंतचा मृतांचा आकडा 89 वर पोहचला आहे. तसंच चार जण अजूनही बेपत्ता आहेत. पावसामुळं 68 जण जखमी झाले आहेत. राज्यात आतापर्यंत सुमारे 1400 घरांचं नुकसान झालंय. त्यामुळं 44 घरं पूर्णपणे उद्धवस्त झाली आहेत. पुराच्या पाण्यात वाहून जाणे, तसेच मुसळधार पावसामुळे 181 जनावरे दगावली आहेत.

हेही वाचा: Gautam Adani : बिल गेट्स यांना मागं टाकत गौतम अदानी बनले जगातील चौथे 'श्रीमंत'

सध्या जवळपास आठ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलंय. राज्यात सर्वाधिक फटका गडचिरोली जिल्ह्याला बसला असून सुमारे दोन हजार नागरिकांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आलंय. राज्यात ठिकठिकाणी जवळपास 52 मदत कँप उभारण्यात आले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरड कोसळल्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. राज्यात एनडीआरएफची 13 पथकं राज्यात ठिकठिकाणी बचावकार्य करत आहेत. त्यामध्ये ठाणे, रत्नागिरी, कोल्हापूर, रायगड आणि मुंबईत प्रत्येक दोन आणि सातारा, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक पथक आहे. एसडीआरएफचीही पाच पथकं बचावकार्यात सहभागी झाली आहेत. सध्या काही जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरत आहे.

Web Title: Rain Latest Updates 89 Citizens And 181 Animals Died Due To Rain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..