कोयना धरणात 83 TMC साठा; जलाशयात प्रतिसेकंद दोन हजार 586 क्युसेक पाण्याची आवक, महाबळेश्वरात 21 MM पाऊस

जलाशयात प्रतिसेकंद दोन हजार ५८६ क्युसेक पाण्याची होत आहे आवक
Koyna Dam
Koyna Damesakal
Summary

कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ८२.९८ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद दोन हजार ५८६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे.

पाटण : कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्यात सलग पाचव्या दिवशी पावसाने विश्रांती घेतली आहे. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १९ मिलिमीटर, नवजा व महाबळेश्वरला (Mahabaleshwar) २१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा ८२.९८ टीएमसी झाला असून, जलाशयात प्रतिसेकंद दोन हजार ५८६ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पावसाने विश्रांती घेतली असल्यामुळे जलाशयात होणारी पाण्याची आवक कमी झाली आहे.

Koyna Dam
Koyna Dam च्या पायथा वीजगृहातील विसर्ग थांबवला; कोयनानगर, महाबळेश्वरात 'इतक्या' मिलिमीटर पावसाची नोंद

तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मिलिमीटरमध्ये अशी : सातारा ४५७, जावळी ८११, पाटण ८५९, कऱ्हाड २४२, कोरेगाव १९४, खटाव १४७, माण ११८, फलटण ८९, खंडाळा १३४, वाई ३२८, महाबळेश्‍वर २३१८. या सर्वांची सरासरी ७६.१ टक्के आहे.

Koyna Dam
INDIA Alliance : देशात 'इंडिया अलायन्स' भक्कम, शरद पवार सुद्धा..; उलट-सुलट चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्याचं मोठं विधान

धरणांची स्थिती

धरणाचे नाव - उपलब्ध पाण्याची टक्केवारी

  • कोयना - ८२.९८

  • धोम - ८२.९८

  • धोम - बलकवडी ८७.३७

  • कण्हेर - ७७.३७

  • उरमोडी - ६२.२८

  • तारळी - ८५.४५.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com