Vasant More : राज ठाकरेंच्या फ्रंट सीटवर वसंत मोरे? आता टार्गेट फक्त बारामती

मनसे नेते वसंत मोरे यांचं पक्षात चांगलंच वजन वाढताना पाहायला मिळालंय. कारण बैठक झाली तेव्हा राज ठाकरेंनी स्वतः मोरेंना आपल्या गाडीत फ्रंट सीटवर बसायला सांगितलं आणि...
Vasant More And Raj Thackeray
Vasant More And Raj Thackerayesakal

अक्षता पांढरे

Vasant More And Raj Thackeray : राज्यात शिवसेना, शिंदे गट, भाजप आणि काँग्रेसमध्ये वादविवाद सुरु असताना मनसे मात्र पक्षबांधणीच्या कामाला लागलंय आहे. यातचं 22 ऑगस्टला मुंबईत राज ठाकरेंच्या उपस्थितीत  मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. दरम्यान या बैठकीनंतर मनसे नेते वसंत मोरे यांचं पक्षात चांगलंच वजन वाढताना पाहायला मिळालंय. कारण बैठक झाली तेव्हा राज ठाकरेंनी स्वतः मोरेंना आपल्या गाडीत फ्रंट सीटवर बसायला सांगितलं. आणि या मगच खास कारण म्हणजे बैठकीत राज यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाची कमान वसंत मोरे यांच्यावर सोपवली आहे. 

आता बारामती म्हंटल कि, राष्ट्रवादी अर्थात पवारांचा अभेद्य बालेकिल्ला. कारण इतिहास आहे राष्ट्रवादी सोडता तिथं कुठल्याही पक्षाचा कितीही मोठा नेता उभा राहिला तरी पवार घराण्यासमोर त्याचा टिकाव लागावं अवघड काम आहे. 

म्हणजे गेली 50 एक वर्षांपासून तिथे पवार घराण्याचंच वर्चस्व आहे. 1967 सालापासून शरद पवार तिथून निवडून आले, काँग्रेसमधून बाहेर पडत त्यांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली पण बारामती त्यांचीच राहिली. त्यांनतर त्यांचे पुतणे अजित पवार 1991 सालापासून बारामती विधानसभेवर निवडून येत आहेत. म्हणजे अजित पवार आधी लोकसभेवर निवडणून आले होते मात्र शरद पवार संरक्षण मंत्री बनल्यावर अजित पवारांनी बारामती विधानसभा मारली जी आजही त्यांच्याच हातात आहे. आणि पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील बारामती मधूनचं सुरुवात करून केंद्रात आपला दबदबा तयार केलाय.

आता मनसे आणि राष्ट्रवादीच्या संबंधांबद्दल बोलायचं झालं तर, राज ठाकरेंची आधीची काही भाषण पहिली तर शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या बाजूने होती, पण अलीकडच्या काळात या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष वाढलाय, त्यामुळे एकमेकांवर वादग्रस्त वक्तव्यांचं सत्र सुरूच आहे.

आता वसंत मोरे यांच्याबद्दल सांगायचं तर, एकेकाळी कात्रज परिसरात वसंत मोरे यांची सच्चा शिवसैनिक म्हणून ओळख होती, म्हणजे असंही म्हणतात शाळेत असताना वसंत मोरे आपल्या वह्यांवर शिवसेना, जय महाराष्ट्र लिहायचे, एकदा त्यांच्या या शिवसेना प्रेमापायी त्यांना मारही खावा लागला होता. कात्रज भागात शिवसेनेची शाखा सुरु करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती, शिवसेनेत ते राज ठाकरे यांचे खंदे समर्थक होते. जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली, तेव्हा राज यांच्यासोबत बाहेर पडणाऱ्यांमध्ये वसंत मोरे देखील होते. तेव्हापासून ते मनसे सोबतचं आहेत.

मात्र मध्यंतरी वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. एवढंच नाही संजय राऊत यांच्या सोबतच्या बैठकीनंतर ते पुन्हा शिवसेनेत जाणार अशीही चर्चा होती. पण राज यांच्या भेटीनंतर या सगळ्या चर्चा बंद झाल्या.

दरम्यान आता मोरे यांना बारामतीची कमान सांभाळायला दिलीये. आणि जसं कि आधीच सांगितलं बारामतीत राष्ट्रवादी सोडून दुसऱ्या कुठल्या नेत्याचा टिकाव लागणं मुश्किल काम आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर, भाजपने गेल्या निवडणुकीच्या वेळी गोपीचंद पडळकर यांना बारामतीची जबाबदारी दिली होती, पण त्यांचा तो पर्यंत पूर्णतः फ्लॉप गेला. पण हो भाजपच्याच कांचन कुल यांनी सुप्रिया सुळे यांना दिलेली टफ फाईट देखील आपण विसरू शकत नाही.

आता मनसेचा राजकीय इतिहास पहिला तर ते अजून अवघड काम आहे, पण तरीही वसंत मोरे यांचा फॅन क्लब सुद्धा काही कमी नाही, एक फायर ब्रिगेड नेता अशी त्यांची ओळख आहे, त्यामुळे बारामतीत ते मनसेला कश्याप्रकारे उभं करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com