Raj Thackeray criticism narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनावर राज ठाकरे भडकले 'भुर्दंड जनतेला का ?'

Raj Thackeray latest news : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका करत ‘भुर्दंड जनतेलाच का?’ असा सवाल उपस्थित केला आहे.
Raj Thackeray criticism narendra Modi

Raj Thackeray criticism narendra Modi

esakal

Updated on

Raj Thackeray on PM Modi appeal : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना काटकसरीचे आवाहन केल्यानंतर विरोधकांकडून टीका होत आहे. दरम्यान, राज ठाकरे यांनी या आवाहनावर 'एक्स'द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल उपस्थित केले आहेत. “काटकसरीची सुरुवात आधी सत्ताधाऱ्यांनी स्वतःपासून करावी. जनतेला त्यागाचे आवाहन करत असताना सत्ताधारी नेत्यांचे ताफे, मिरवणुका आणि उधळपट्टी थांबणार का?” असा सवाल करत राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवरही निशाणा साधला. देशातील आर्थिक परिस्थिती, रुपयाचे अवमूल्यन आणि वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर सरकारने जनतेसमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com