Vidhan Sabha 2019 : आम्हाला विरोधीपक्षाची सत्ता द्या, आमची भूमिका स्पष्ट : राज ठाकरे

टीम ई-सकाळ
Thursday, 10 October 2019

मी तुमच्याकडे एक मागणी करायला आलो आहे. राज्याला एक कणखर, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्षातील आमदार तुमच्या मनातील खदखद विचारू शकतो.

- राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे.

मुंबई : मी तुमच्याकडे एक मागणी करायला आलो आहे. राज्याला एक कणखर, प्रबळ विरोधी पक्षाची गरज आहे. विरोधी पक्षातील आमदार तुमच्या मनातील खदखद विचारू शकतो. सत्तेतील आमदार हे करू शकत नाही. आज मी प्रबळ विरोधी पक्षासाठी तुमच्याकडे आलोय. आजपर्यंत देशात अशी मागणी कोणी केली नसेल. माझा आवाका पाहून मी ही मागणी करत आहे, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. 

ईडीच्या चौकशीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे जाहीर सभेत बोलताना दिसले. पुण्यातील सभा रद्द झाल्यानंतर आज मुंबईत त्यांची सभा झाली. या सभेत त्यांनी पुण्यातील परिस्थितीवरून सरकारला लक्ष्य केले.

Vidhan Sabha 2019 : मुख्यमंत्री म्हणाले, शरद पवारांची अवस्था शोलेमधल्या जेलरसारखी!

राज ठाकरे म्हणाले, ''पुण्यात अर्धा-पाऊण तास पाऊस पडला पण पुरती वाट लावून गेला. शहराची वाट लावून टाकली आहे. बसवर झाड कोसळल्याने पीएमपी ड्रायव्हरला जीव गमवावा लागला. सगळीकडे लाईट गेल्या होत्या. अंधारात बसलो होतो. मी कोणाशी बोलतोय हे कळत नव्हते. ठाण्यातही तिच परिस्थिती आहे. खड्ड्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला आहे. शहराचा विचका झाला आहे. राजकारणी येऊन आश्वासने देतात आणि तुम्ही विश्वास ठेवता. पुण्यासारखे शहर विस्कळीत होत असेल.'' 

Vidhan Sabha 2019 : पुण्यात नाही, पाण्यात राहता म्हणून सांगा : राज ठाकरे

भाजपमुळे पीएमसी बँकेचा गैरव्यवहार झाला.  आज नागरिक पैसे काढण्यासाठी तरसले आहेत. पीएमसी बँक कोणी बुडवली, हे पाहा. न्यायालयाकडून न्याय मिळेल की नाही, ही शंका आहे. न्यायालय, सरकारकडून न्याय मिळत नाही. बेरोजगार आहे त्यांना रोजगार मिळत नाही, अशी आजची परिस्थिती आहे. तरुणांना दिलेल्या नोकऱ्यांच्या आश्वासनांचे काय झाले, असा प्रश्न राज ठाकरे यांनी सरकारला केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray Demanding for Opposition Leadership Maharashtra Vidhan Sabha 2019