
शाहीर साबळेंच्या जीवनावर येणार चित्रपट, मनसेच्या सभेत घोषणा
औरंगाबाद : शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लवकरच येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी केदार शिंदे, अंकुश शिंदे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचे टिझर दाखवण्यात आला. (Raj Thackeray News Shahir Sabale Film Poster Release In MNS Sabha In Aurangabad)
राज ठाकरे यांनी ठाणे येथे पार पडलेल्या गुडीपाडवा मेळाव्यात औरंगाबादेत सभा घेणार असे जाहीर केले होते. त्यामुळे महाराष्ट्रात चांगलेच राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केले होते, की मराठवाडा सांस्कृतिक मैदानावरच सभा होणार, मात्र औरंगाबाद पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी सभेला परवानगी दिली नव्हती. अखेर गुरुवारी (ता.२८) सभेला परवानगी दिली. तसेच १६ अटीही घालण्यात आले.
महाराष्ट्र दिनी कामगार दीन, महाराष्ट्र दीन झाला आहे. राज ठाकरे यांची सभा मुंबई, ठाणे येथे पार पडली. त्यावर देशाचे लक्ष होते. सभेतील लोकांनी काम केले, तर पुढील महापौर मनसेचा असेल, असा विश्वास मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी व्यक्त केला.