किल्ले भाड्याने देण्याच्या विषयावर अखेर बोलले राज ठाकरे!

टीम ई-सकाळ
रविवार, 8 सप्टेंबर 2019

मुंबई : शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन गड किल्ल्यांचा विकास करण्याच्या नावाखाली लग्न समारभांसाठी भाड्याने देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने घेतला आहे. त्यावर राज्यातील सर्वच स्तरांतून टिका झाली आहे. विरोधीपक्षांनी या निर्णयावरून सरकारला धारेवर धरले आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्य राज ठाकरे यांनीही याविषयावर भाष्य केले आहे.

आणखी वाचा : मराठ्यांच्या शौर्याचा साक्षीदार साल्हेर भाडे तत्वावर!

पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया
सरकारच्या निर्णयानंतर राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. त्यातर राज ठाकरे म्हणाले, ‘केंद्रात आणि राज्यात मंत्र्यांना काही काम नाही. केंद्रात दोन माणसे निर्णय घेत आहेत. तर, राज्यात एक माणूस निर्णय घेत आहेत. त्यामुळे मंत्र्यांना काही काम नाही. त्यामुळे लाखो रुपये खर्च होणारे मंत्र्यांचे बंगले रिकामेच आहेत. जर, सरकारला महसूलच गोळा करायचा आहे. तर, मंत्र्यांचे बंगले लग्न समारंभासाठी भाड्याने द्यावेत.’

आणखी वाचा : साल्हेर, नळदूर्गसह हे किल्ले देणार भाडे तत्वावर

सरकारची मॅच फिक्स
निवडणुकीविषयी भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, ‘सरकारला सर्वसामान्यांच्या भावनांशी काही देणे-घेणे नाही. सरकारची मॅच फिक्स आहे. त्यामुळे सर्वसामान्यामध्ये चीड निर्माण होईल, अशी भीतच सरकारला वाटत नाही. त्यामुळेच हे असले निर्णय घेण्याचं धाडस सरकार करत आहे.’ या वक्तव्यातून राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला आहे. देशातील निवडणुकी ईव्हीएम ऐवजी पुन्हा बॅलेट पेपरवर घ्याव्यात, यासाठी राज ठाकरे यांचा आग्रह आहे. राज यांनी याप्रकरणी निवडणूक आयोगा भेट देऊन त्यांना निवेदनही दिले आहे. तसेच या मागणीसाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोर्चेबांधणी करण्याचाही प्रयत्न केला आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: raj thackeray reaction on turning forts into hotels maharashtra bjp government decision