हे पवारांचं जंतरमंतर...! राज ठाकरेंनी तीन वर्षांपूर्वीची पोस्ट काढत डिवचलं, नेमकं काय म्हटलं?

Raj Thackeray on Sharad Pawar : शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मोदी सरकारच्या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार सुरू असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Raj Thackeray

Raj Thackeray

esakal

Updated on: 

संसदेच्या विशेष अधिवेशनात डिलिमिटेशन विधेयक मांडलं जाण्याची शक्यता असल्याने देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेससह इंडिया आघाडीतील काही पक्षांनी या विधेयकाला विरोध केला आहे. मात्र, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून मोदी सरकारच्या विधेयकाला पाठिंबा देण्याबाबत विचार सुरू असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांच्या राजकारणावर खोचक टिप्पणी केली आहे.

Loading content, please wait...