Raj Thackeray : कधीही मिंधे होऊ नका; राज ठाकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Raj Thackeray
Raj Thackeray esakal

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सडेतोड बोलण्यासाठी सर्वांना परिचित आहेत. ते आपल्या भूमिकेमुळे नेहमीच चर्चेत असतात. आज राज ठाकरे यांनी मुंबईतील व्हिजेटीआय महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात कॉलेजमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी उच्चारलेला एक शब्द चर्चेत आला आहे.

Raj Thackeray
Shivsena Row : नाव व चिन्ह जायची कुणकूण लागली अन् उद्धव ठाकरेंनी पक्षनिधी वळवला; फडणवीसांच्या भावाचा दावा

राज ठाकरे म्हणाले की, आपण शिवरायांचे वारसदार आहोत, हे कधी विसरू नका. मराठी पताका ही कायम स्वरूपी डोक्यात ठेवा. तुम्ही मराठी आहात, तुम्ही कोणाचे वारसदार आहात हे लक्षात ठेवा.

मित्र-मैत्रीण करताना कधीही कोणाची जात पाहू नका, या जातीपाती मधून काहीही हाताला लागणार नाही, आपण मराठी आणि हिंदू आहोत येवढं फक्त लक्षात ठेवा. असा मोलाचा सल्ला राज ठाकरे यांनी कॉलेजवयीन मुला-मुलींना दिला आहे.

Raj Thackeray
अमित शहांचा कोल्हापूर दौरा भाजपला पावला; कोल्हापुरात अपक्ष आमदाराचा भाजपात प्रवेश

यावेळी ते म्हणाले की, आपण म्हणतो मराठेशाहीने काय केलं तर त्यांनी अटकेपार झेंडे फडकवले. मराठा साम्राज्य पाकिस्तानातील अटोक किल्ल्यावर झेंडे फडकवले. आपण या लोकांचे वापसदार आहोत हे विसरू नका आणि कधी कोणासमोर मिंधे होऊ नका, असा सल्ला राज यांनी दिला. वास्तविक उद्धव ठाकरे सातत्याने शिंदे गटातील आमदारांना मिंधे म्हणून संबोधतात. त्यामुळे राज ठाकरेंचा टोला शिंदे गटाला तर नव्हता ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com