
राज्य सरकारने वादग्रस्त त्रिभाषा धोरणाची अधिसूचना रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी लादता येणार नाही. हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे यांनी स्वतंत्र मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. पण दोघांनीही नंतर एकत्रच मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर सरकारने एक पाऊल मागे येत हिंदी सक्तीबाबतचे दोन्ही जीआर रद्द केले. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी विजयी मेळावा आयोजित केला आहे. वरळीतील एनएससीआय डोम इथं ५ जुलै रोजी मेळावा होणार असून त्याची तयारी केली जात आहे. या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे एकत्र व्यासपीठावर दिसणार आहेत.