केंद्र सरकारकडून अपेक्षा नाही, ते वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करतायत; राज ठाकरेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबईत दर दिवशी चार ते पाच मुली बेपत्ता होत असल्याचं दिसून येतंय. आता यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. तसंच केंद्र सरकारकडून अपेक्षा नसल्याचंही ते म्हणालेत.
Letter to Fadnavis Raj Thackeray Raises Mumbai Safety Alarm

Letter to Fadnavis Raj Thackeray Raises Mumbai Safety Alarm

Esakal

Updated on

राज्यात विशेषत: मुंबईतून मुली बेपत्ता होण्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आ हे. गेल्या दहा महिन्यात १२०० अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली. या आकडेवारीवरून मुंबईत दर दिवशी चार ते पाच मुली बेपत्ता होत असल्याचं दिसून येतंय. आता यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. तसंच केंद्र सरकारवर घणाघाती टीकाही केलीय. लहान मुलांना पळवणाऱ्या टोळ्या असून त्यांच्यावर सरकार काय कारवाई करतंय ते समजत नसल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलंय. वंदे मातरमवर तावातावाने चर्चा करणाऱ्या केंद्र सरकारला मातांचा आक्रोश ऐकू येत असेल असं वाटत नसल्याचंही राज ठाकरे म्हणाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com