Will Raj and Uddhav Thackeray come together : महाराष्ट्रात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावांना एकत्र आणण्याची जोरदार चर्चा सुरू आहे. दोन्ही नेते याबाबत सकारात्मक असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंनी "लवकरच बातमी देतो" असे म्हणत युतीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, दोघांना एकत्र आणण्यासाठी नातेवाइकांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. त्यामुळे हे नातेवाईक नेमके कोण असू शकतात, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.