नांदेड : एसटी कामगारांना सरकारकडून सहानभुतीची अपेक्षा

कारवाईमुळे अडचणीत; काही जण अटींवर परतण्‍याच्या तयारीत
ST Bus
ST Busesakal

नांदेड : एसटी महामंडळाचे (MSRTC)राज्य शासनात विलनीकरण(merge in state government) करण्याच्या अटीवर अडून बसलेल्या कामगारांवर निलंबन आणि सेवेतून बडतर्फ करण्याच्या कारवाई केली जात आहे. त्यामुळे संपात सहभागी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कामगार आणि चालक, वाहक यांच्यात दोन गट पडले आहेत. अनेक कामगार कामावर परत येण्याच्या मनस्थितीत आहेत. मात्र, यासाठी कामगारांना कार्यालय प्रमुखांच्या सहानुभुतीची अपेक्षा आहे.

शहरातील मुख्य आगारातील चालक, वाहक व एसटी वर्कशॉपमधील कार्यालयीन कामगार यांचे उपोषण सुरुच आहे. कामगारांना कामावर परत येण्याची विनंती करुन देखील कामगार कामावर येत नसल्याने महामंडळाकडून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई आणि त्यानंतर बडतर्फची नोटीस पाठवून त्यांना सेवेतून कमी करण्याचा धडाका सुरु आहे. त्यामुळे अनेक कामगार भेदरले आहेत. त्यांची कामावर येण्याची इच्छा आहे मात्र, कामावर परत येणाऱ्या कामगारांकडून एसटी महामंडळाचे झालेले नुकसान भरपाईची हमी घेतली जात असल्याने ते कामावर येण्यास धजावत नसल्याचे पुढे आले आहेत.

ST Bus
नांदेड जिल्हा पुन्हा कोरोनाच्या विळख्यात

शासनाच्या कारवाईच्या धास्तीने घाबरलेल्या कामगारांना मात्र वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून सहानुभुतीची गरज आहे. परंतु अधिकारी त्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभुती दाखवत नसल्याचे संपातील अनेक कर्मचारी यांनी मनातील खदखद बोलून दाखवली आहे. वर्कशॉपमध्ये कामावर रुजू होण्यास राजी असलेल्या कर्मचाऱ्यांना सहानुभुती सोबतच नुकसान भरपाईबद्दल लिहुन घेणे किंवा इतर बंधणे घालणे प्रशासनाने थांबवावे. कर्मचाऱ्यांवर कारवाई न करण्याचे आश्‍वासन द्यावे तेव्हा कामगारांमध्ये वरिष्ठांबद्दल विश्‍वास वाटेल आणि कामावर परतण्याची भीती वाटणार नाही, असे अनेक कर्मचाऱ्यांचे मत आहे. सध्या विभागातून नऊ बस सुरु झाल्या आहेत. त्या नांदेड - देगलूर, भोकर, अहमदपूर, हैदराबाद या मार्गावर धावत आहेत. सोमवारी (ता. दहा) या नऊ बसने दुपारपर्यंत १९ फेऱ्या पूर्ण केल्या होत्या. यात ५७६ प्रवाशांनी प्रवास केला आहे. मात्र, असे असले तरी, शिवनेरी, शिवशाही, हिरकणी बस अद्याप प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली नाही.

ST Bus
नांदेड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
  1. नांदेड विभागातील कर्मचाऱ्यांची माहिती- ३,१४७

  2. एकुण कर्मचारी संख्या- २,३२२

  3. संपात सहभागी कर्मचारी- २७९

  4. निलंबित कर्मचारी- ५४

  5. बडतर्फ कर्मचारी- १०७

  6. रजेवरील कर्मचारी संख्या-३८५

#nanded #msrtc #stworkers #stategovernment #stworkersprotest #sakalnews #marathinews #maharashtra

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com