Raju Shetti I राज्यसरकार आणखी किती मुडदे पाडणार आहे? राजू शेट्टी संतापले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

raju shetti

'निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून याला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार'

राज्यसरकार आणखी किती मुडदे पाडणार आहे? राजू शेट्टी संतापले

बीड जिल्ह्यातील गेवराई या गावातील नामदेव जाधव या ३५ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. साखर कारखान्याला ऊस गाळपाला जात नसल्याच्या नैराश्येमुळे त्यांने हे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवले आहे. दरम्यान, या मुद्द्यावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकावर टीका केली आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असून याला सर्वस्वी राज्यकर्ते जबाबदार आहेत. राज्यसरकार आणखी किती मुडदे पाडणार आहे आणि किती मुडद्यांवर राज्य करणार आहे, असा खोचक सवालही शेट्टी यांनी केला आहे.

यावेळी शेट्टी म्हणाले, नामदेव जाधव या गेवराई येथील शेतकऱ्याने नैराश्येच्या भरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. दोन एकर उस असणाऱ्या नामदेव जाधवने साखर कारखान्यांच्या अधिकाऱ्याकडे, मुकादमाकडे आणि उसतोडणी मशीन मालकाकडे अनेक ऊस गाळप करण्यासाठी अनेक हेलपाटे घातले.

हेही वाचा: राज्यात पावसाला सुरुवात, कोकण किनारपट्टीसह पश्चिम महाराष्ट्रात 'अलर्ट'

पैशाची मागणी करुन उसतोड करण्यास नकार दिल्याने त्याने नैराश्येच्या भरात आत्महत्या केली आहे. त्यामुळे याला कारणीभूत असणारे मुकादम, अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. खरंतर एक वर्षापूर्वी मराठवाड्यात अतिरिक्त ऊस पिकणार हे सरकारला माहित होते. ज्या पद्धतीने टंचाईच्या काळात जिल्हाधिकारी शेतकऱ्यांच्या विहीरी अधिगृहीत करुन पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देतात.

अशाच पद्धतीने बंद साखर कारखाने ताब्यात घेऊन सक्षम यंत्रणेकडे एक वर्षासाठी चालावायला देता येऊ शकते. उपाययोजना करुन जाधव यांचा ऊस गाळपास देता आला असता, परंतु हे करायला सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे अशा निष्पाप शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. याला सर्वस्वी असून राज्यकर्ते जबाबदार असून तुम्ही अजून किती मुडदे पाडणार आहेत हे सांगावे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

हेही वाचा: देशातील जनता सुजाण, राज्यकर्ते चुकल्यास धडा शिकवते - शरद पवार

Web Title: Raju Shetti Criticized To Maha Vikas Aghadi Govt On Beed District Farmers Suicide

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top