Medha Kulkarni : मेधा कुलकर्णींच्या एका राज्यसभेमुळे भाजपने साधले 'इतके' फायदे; उमेदवारीमागचं नेमकं राजकारण काय?

राज्यसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. येत्या २७ फेब्रुवारीला ५६ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. ज्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. अशात कोणला उमेदवारी मिळणार, कोणाचं पुनर्वसन होणार? कोणाचा पत्ता कट होणार ? या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या.
Medha Kulkarni
Medha Kulkarni esakal

राज्यसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्यात. येत्या २७ फेब्रुवारीला ५६ जागांसाठी निवडणुका होणार आहेत. ज्यात महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश आहे. अशात कोणला उमेदवारी मिळणार, कोणाचं पुनर्वसन होणार? कोणाचा पत्ता कट होणार ? या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु होत्या. अशात भाजपने आपल्या राज्यसभेच्या उमेदवारांची घोषणा केली. ज्यात नुकताच काँग्रेसमधून बाहेर पडलेले अशोक चव्हाण, अजित घोरपडे तिसरे नाव म्हणजे पुण्याच्या मेधा कुलकर्णी.

पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा सुरु असातानाच मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपने त्यांच पुनर्वसन केल्याचं बोललं जात. पण पुनर्वसन करण्यासोबतच भाजपने सेफ गेम खेळला का? असा प्रश्नही उपस्थित होतोय?

मेधा कुलकर्णी भाजपच्या कोथरूडच्या माजी आमदार, तसेच पक्षाच्या महिला मोर्चाच्या त्या राष्ट्रीय उपाध्यक्षादेखील आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत त्या मोठ्या मतांनी कोथरुडमधून विजयी झाल्या होत्या. शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे यांचा त्यांनी ६४ हजार मतांनी पराभव केला होता. २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत विधानसभेसाठी मेधा कुलकर्णींना उमेदवारी नाकारण्यात आली होती. तर त्यांच्या ऐवजी चंद्रकांत पाटलांना उमेदवारी देण्यात आली होता. त्यानंतर मेधा कुलकर्णी पक्षाच्या कारभारावर नाराज होत्या. केंद्रीय नेतृत्वाकडेही तक्रार नोंदवत त्यांना आपली नाराजी उघड केली होती.

Medha Kulkarni
Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी; सेन्सेक्स 278 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स जोमात?

त्यानंतर झालेल्या विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकांच्या वेळी मेधा कुलकर्णींना संधी दिली जाईल अशी चर्चा होती. पण तेव्हाही त्यांना डावलण्यात आला. आपली राजकीय नाराजी त्यांनी माध्यमांसमोरही बोलून दाखवली होती. त्यानंतर त्यांची भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

त्यात कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी भाजपने रासनेंना निवडणुकीत उमेदवारी दिली होती. त्यामुळे भाजप ब्राम्हण उमेदवाराला डावलतोय का? असं चित्रं तयार व्हायला लागलं होतं. म्हणजे माजी आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये टिळक घराण्यातील उमेदवार न देता स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपकडून ब्राह्मणांना गृहीत धरले जात आहे, त्यामुळेच उमेदवारी दिली नाही, अशी भावना ब्राह्मण समाजात निर्माण झाली. त्याचा फटकादेखील या निवडणुकीमध्ये बसल्याने रासने यांचा पराभव झाला, असे मानले जाते.

अशा परिस्थितीचा संभाव्य फटका भाजपला येत्या लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकीत बसला असता, त्यामुळे भाजपने मेधा कुलकर्णी यांना राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देऊन त्यांचं पुनर्वसन केल्याचं बोलले जातं.

मेधा कुलकर्णींना राज्यसभा देऊन भाजपने चंद्रकांत पाटलांची आमदारकीसुद्धा सेफ केली. म्हणजे येत्या विधानसभा निवडणुकीतही कोथरुडची जागा एकप्रकारे चंद्रकांत पाटलांना मिळणार हे जवळपास निश्चित दिसून येतंय.

Medha Kulkarni
Gangster Chirag Loke Die: शरद मोहोळनंतर आणखी एका गुंडाची हत्या; हल्ल्यात पत्नी देखील गंभीर जखमी

सगळ्यात महत्वाच म्हणजे भाजप नेत्यांचा वापर करून सोडून देतं, हा जो डाग होता तो पक्षाने पुसून टाकण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला आहे. म्हणजे नव्या भरतीत, नव्या नेत्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजप जुन्या नेत्यांना संधी देत नाही, अशी ओरड होती. पण आता ५ वर्षांनी का होईना भाजपने मेधा कुलकर्णींना न्याय दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com