Stock market rebounds to close at 71,833; Nifty settles at 21,851
Stock market rebounds to close at 71,833; Nifty settles at 21,851Sakal

Share Market Closing: सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी; सेन्सेक्स 278 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स जोमात?

Share Market Closing Latest Update 14 February 2024: BSE सेन्सेक्स 278 अंकांच्या वाढीसह 71,833 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 106 अंकांच्या वाढीसह 21850 अंकांच्या पातळीवर बंद झाला.

Share Market Closing Latest Update 14 February 2024: BSE सेन्सेक्स 278 अंकांच्या वाढीसह 71,833 अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 106 अंकांच्या वाढीसह 21,850 अंकांच्या पातळीवर बंद झाला. शेअर बाजारात निफ्टी मिड कॅप 100, बीएसई स्मॉल कॅप आणि निफ्टी बँक निर्देशांकांत वाढ झाली तर निफ्टी आयटी निर्देशांक घसरणीसह बंद झाला.

शेअर बाजारातील सर्वाधिक वाढणाऱ्या शेअर्समध्ये बीपीसीएल, एसबीआय, ओएनजीसी आणि कोल इंडियाच्या शेअर्सचा समावेश होता, तर सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये सिप्ला, डॉ रेड्डीज आणि इन्फोसिसच्या शेअर्सचा समावेश होता.

शेअर बाजारात तेजी
शेअर बाजारात तेजीSakal

एसबीआयचा शेअर टॉप गेनर ठरला

सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांपैकी 20 शेअर्स वाढीसह आणि 10 शेअर्स घसरणीसह बंद झाले. एसबीआयमध्ये चार टक्क्यांनी वाढ झाली आणि तो 742 रुपयांवर बंद झाला. याशिवाय टाटा स्टील, ॲक्सिस बँक आणि मारुती यांचे शेअर्स सर्वाधिक वाढले.

Stock market rebounds to close at 71,833; Nifty settles at 21,851
WPI Inflation: सर्वसामान्यांना मोठा दिलासा! घाऊक महागाई दर 0.27 टक्क्यांवर; काय आहे कारण?
S&P BSE SENSEX
S&P BSE SENSEXSakal

दुसरीकडे, टेक महिंद्राचा शेअर तीन टक्क्यांच्या घसरणीसह 1292 रुपयांवर बंद झाला आणि तो सर्वाधिक घसरला. याशिवाय टीसीए, इन्फोसिसच्या शेअर्स सारख्या इतर आयटी शेअर्समध्येही मोठी विक्री झाली. गौतम अदानी समूहाच्या 10 कंपन्यांपैकी 9 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह व्यवहार करत होते तर अदानी एनर्जी सोल्यूशनचे शेअर्स किंचित घसरणीसह बंद झाले.

Stock market rebounds to close at 71,833; Nifty settles at 21,851
Paytm Crisis: पेटीएमला मोठा धक्का! पेटीएम पेमेंट बँकेवर फेमा अंतर्गत गुन्हा दाखल, पुढे काय होणार?

गुंतवणूकदारांनी कमावले 4.25 लाख कोटी रुपये

13 फेब्रुवारी 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप रुपये 3,80,75,872.35 कोटी होते. आज म्हणजेच 14 फेब्रुवारी 2024 रोजी वाढून 3,85,01,475.78 कोटी रुपये झाली आहे. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात 4.25 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सुरुवातीच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे भांडवल 4 लाख कोटी रुपयांनी कमी झाले होते आणि आता बाजार बंद झाल्यानंतर भांडवलात 4 लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com