Lata Mangeshkar
Lata MangeshkarSakal

लतादीदींचे शिवाजी पार्कवर स्मारक उभारा; भाजपची मागणी

Summary

भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शिवाजी पार्कवर जिथे अंत्यसंस्कार झाले तिथे स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे भाजप नेत्याने केली आहे.

मुंबई - भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्यावर मुंबईत शिवाजी पार्कवर (Shivaji Park, Dadar) अंत्यसंस्कार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) अंत्यदर्शन घेण्यासाठी काल शिवाजी पार्कवर आले होते. काल सायंकाळी सातच्या सुमारास लता मंगेशकर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. यानंतर आता भाजप आमदार राम कदम यांनी शिवाजी पार्कवर लता मंगेशकर यांचे स्मृतिस्थळ उभारण्यात यावं अशी मागणी केली आहे.

राम कदम यांनी म्हटलं की, भारतरत्न दिवंगत स्वर्गीय लता दीदी यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क दादर, मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यामुळे, त्याच जागी शिवाजी पार्कावर गानकोकिळा भारतरत्न स्वर्गीय लतादीदी यांचे स्मृतीस्थळ उभारून त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन कराव्यात. कोट्यवधी संगीतप्रेमी व लतादीदींचाच्या चाहत्यांच्यावतीने मी ही विनंती करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

संगीतप्रेमी आणि चाहत्यांच्या विनंतीचा, भावनेचा सन्मान करावा. त्याच ठिकाणी जगाला प्रेरणा देणारं स्मृतीस्थळ बनवावं अशी मागणी राम कदम यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

Lata Mangeshkar
गानकोकीळेच्या अंतिम प्रवासाचा चित्रमय आढावा; पाहा कसे झाले अंत्यसंस्कार

लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. २८ दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र रविवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर देशभरात दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्रात आज (सोमवार) सार्वजनिक सुट्टी राज्य सरकारच्यावतीने जाहीर करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com