Ramdas Athawale: ठाकरेंनी रामरक्षा नव्हे तर ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करावे; मंत्री आठवलेंचा टोला

Ramdas Athawale Targets Uddhav Thackeray: राम मंदिर दानपेटी प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या रामरक्षा आंदोलनावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली.
Ramdas Athawale

Ramdas Athawale

esakal

Updated on

सांगली: ‘‘उद्धव ठाकरे यांनी रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा ‘शिवसेना रक्षा’ आंदोलन करण्याची गरज आहे. त्यांनी आधी आपल्या पक्षातील आमदार-खासदार टिकवावेत. यासाठी श्रीरामाला साकडे घालावे, ’’ अशी टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. राम मंदिर दानपेटी घोटाळ्याच्या निषेधार्थ ठाकरे यांनी जाहीर केलेल्या ‘रामरक्षा आंदोलन’वर टीका करताना मंत्री आठवले यांनी त्यांना टोला लगावला. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे, राम मंदिर दानपेटी प्रकरण, पेपरफुटी, गायरान जमीन आणि रिपाइंच्या राजकीय प्रतिनिधित्वासह विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली. उद्योजक अशोक खाडे यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमासाठी ते मिरजेत आले होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com