"आदित्य तुझं वय काय, तू आमदारांना बोलतो काय?" रामदास कदमांचा संताप

काल शिवसेनेतून हकालपट्टी केल्यावर रामदास कदम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
Ramdas Kadam
Ramdas KadamSakal

मुंबई : शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम यांची काल उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली. त्यानंतर कदम यांनी माध्यमांसमोर आपली नाराजी व्यक्त केली आहे. मी शिवनेसाठी मोठा संघर्ष केला आणि उद्धव ठाकरे यांनी माझी हकालपट्टी केली असं म्हणत कदम हे माध्यमांना बोलताना रडले आहेत.

राणे, राज ठाकरे, छगन भुजबळांनी शिवसेना सोडली तेव्हा मी संघर्ष केला आणि ते आज माझी हकालपट्टी करतात. असं म्हणत रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त केली. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांच्या आमदारावरील टीकेवर बोट ठेवत त्यांनी निशाणा साधला आहे.

(Ramdas Kadam On Aditya Thackeray)

मागच्या अडीच वर्षापासून शिवसेना कशी संपवायची याचं कटकारस्थान शरद पवार आणि अजित पवार यांनी केलं आहे पण तुम्ही शरद पवारांना सोडलं नाही असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांचे मी आभार मानतो असंही मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवर किती टीका केली गेली, खालच्या पातळीवर जाऊन बोललं गेलं. बैलं, बोकडं, कुत्रे असं म्हणत त्यांना हिणवलं गेलं पण त्यांना हे शोभतं का? त्या आदित्यचं वय काय आणि तो कोणत्या भाषेत आमदारांना बोलतोय? याचं जरा भान ठेवायला पाहिजे... असं म्हणत रामदास कदम यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली.

त्याचबरोबर रामदास कदम यांची ठाकरे यांनी काल पक्षातून हकालपट्टी केली त्यावर बोलताना ते म्हणाले की, तुम्ही हकालपट्टी करण्याच्या अगोदर मी माझा राजीनामा दिला. तुम्ही काय मला काढून टाकणार असं म्हणत अजूनही मला शिवसेनेचा काळजी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला सोडलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

Ramdas Kadam
Shivsena: शिवसेनेच्या बाळा कोकणे यांच्यावर प्राणघातक हल्ला

माझ्या आयुष्याची संध्याकाळ अशी अंधारमय होईल असंं वाटलं नव्हतं. मला शिवसेना पक्षातून काढलं जाईल असं स्वप्नातही विचार केला नव्हता असं म्हणताना रामदास कदम यांच्या डोळ्यातून ढसाढसा अश्रू आल्या होत्या. यावेळी कदम यांनी शिवसेनेवर अनेक आरोप केले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com