प्रवासी ट्रेनमधून तोटाच, रेल्वेला उत्पन्न तर...; रेल्वेमंत्री दानवेंचं मोठं विधान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

File photo of Raosaheb Danve

प्रवासी ट्रेनमधून तोटाच, रेल्वेला उत्पन्न तर...; रेल्वेमंत्री दानवेंचं मोठं विधान

जालना - प्रवासी गाड्यांमुळे रेल्वेला महसुलात काहीही फायदा होत नाही. केंद्र सरकार जनतेच्या सोयीसाठी प्रवासी रेल्वे चालवतं, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. जालना येथे एका विशेष साप्ताहिक रेल्वेला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ते बोलत होते. (raosaheb danve news in Marathi)

हेही वाचा: भाऊबीजेची तयारी सुरू असताना दुर्घटना! चहा पिताच सख्ख्या भावांसह चौघांचा मृत्यू

दानवे म्हणाले की, दररोज (पॅसेंजर) गाड्या चालवून रेल्वेला कोणताही नफा मिळत नाही. खर्च केलेल्या प्रत्येक रुपयामागे ५५ पैशांचा तोटा होता. त्यामुळे प्रवासी गाड्या चालवण्यात काहीही फायदा नाही. पण मोदी सरकार नफ्यासाठी काम करत नाही. जनतेच्या सोयीसाठी आपल्याला या सेवा चालवाव्या लागणार, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याचंही दानवे यांनी नमूद केलं.

हेही वाचा: महाराष्ट्राचा आणखी एक प्रकल्प 'गुजरात'ला; PM मोदी करणार प्रकल्पाचं उद्घाटन

दरम्यान रेल्वे प्रशासन मालगाड्या आणि इतर स्त्रोतांकडून प्रवासी गाड्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न करतं, असंही दानवे यांनी म्हटलं. मराठवाड्यातील लोकांच्या मागणीमुळे खंडवा, प्रयागराज आणि वाराणसी मार्गे छपरासाठी साप्ताहिक रेल्वे सुरू केल्याचंही रेल्वेमंत्री दानवेंनी सांगितलं.