Vidhan Sabha 2019 : खडसेंच्या तिकीटाबद्दल रावसाहेब दानवे म्हणतात...

राजेभाऊ मोगल 
गुरुवार, 3 ऑक्टोबर 2019

एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 35 वर्षांपासून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे आता कुणी कितीही प्रयत्न केले तरी काहीही होणार नाही.

औरंगाबाद : एकनाथ खडसे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 35 वर्षांपासून त्यांना आपल्या पक्षात ओढण्याचे अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे आता कुणी कितीही प्रयत्न केले तरी काहीही होणार नाही. भविष्यात मात्र, पक्ष त्यांचा फार मोठा विचार करेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी येथे व्यक्‍त केली. गुरुवारी सकाळपासून खडसेंच्या भेटीसाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार निघाले असल्याची चर्चा पुढे येत आहे. याअनुषंगाने दानवे यांनी हे मत व्यक्‍त केले. 

विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी गुरुवारी (ता.तीन) फुलंब्री विधानसभा मतदारसंघातून दानवे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खडसे यांच्या नाराजीबद्दल तसेच अन्य पक्षाचे नेते त्यांना पक्षांतर करण्यास सांगत आहेत. याबद्दल विचारले असता. 

Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर; ही आहेत नावे

दानवे म्हणाले, खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना आता तिकीट मिळेल की नाही, हे माहिती नाही. पक्षांतरासाठी आत्तापर्यंत अनेक प्रयत्न झाले. मात्र, त्या प्रयत्नांना खडसे बळी पडले नाहीत. त्यामुळे आत्ताही कुणाचेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. उलट भविष्यात पक्ष त्यांचा मोठा विचार करेल, अशी टिप्पणी दानवे यांनी केली.

मी ठरवलंय भाऊंना निवडलयं; मानसिंगराव नाईक यांचा अर्ज दाखल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raosaheb Danve says about Eknath Khadse Candidacy Maharashtra Vidhan Sabha 2019