Rana Couple I महाआघाडीला मतदान करावे म्हणून नोटीसच्या माध्यमातून माझ्यावर दबाव, राणांचा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ravi Rana

राणा दाम्पत्याला ८ जूनला त्यांना चौकशीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

'मविआला मतदान करावे म्हणून नोटीसच्या माध्यमातून माझ्यावर दबाव'

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. राणा दाम्पत्याच्या खार येथील निवासस्थानी ही नोटीस पाठवण्यात आली असून त्यांच्या विरोधात सत्र न्यायालयात दोषारोपत्र सादर करण्यात येणार आहे. दरम्यान, याप्रकरणावरून आता आमदार राणा यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांचा वापर करत आहेत. या नोटिशीतून राणा दाम्पत्याला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशाप्रकारे पोलिसांचा वापर करुन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. राणा दाम्पत्याला ८ जूनला त्यांना चौकशीसाठी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: नोटांवरील गांधीजींची प्रतिमा बदलण्याचा प्रस्ताव नाही - RBI

ते म्हणाले, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणून, महाविकास आघाडीला मी मतदान करावे म्हणून माझ्यावर नोटीसच्या माध्यमातून दबाव टाकला जात आहे. माझ्या अपक्ष आमदारांसोबत होत असलेल्या भेटी थांबण्यासाठी दबाव आणला जात आहे. मात्र कोणत्याही दबावाला मी बळी पडणार नाही. या निवडणुकीत भाजपाचा उमेदवारच जिंकून येईल, असा विश्वासही आमदार राणा यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांचं खासगी निवासस्थान मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठणावर ठाम असल्यानं शिवसैनिकांनी याला विरोध करत राणांच्या घराबाहेर आदोलन केलं होतं. राणा दाम्पत्य आपल्या निर्णयावर ठाम असल्यानं पोलिस त्यांना कायदेशीर नोटीस देण्यासाठी त्यांच्या खार येथील घरी गेले होते. याकामात राणांनी पोलिसांना सहकार्य केले नाही. उलट पोलिसांवर अरेरावी केल्याचा आरोप केला. या प्रकरणी आयपीसीच्या कलम 353 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा: 'उद्धव ठाकरे म्हणजे माफिया सेनेचे माफिया मुख्यमंत्री'

Web Title: Ravi Rana Criticized To Uddhav Thackeray After Mumbai Police Notice To Rana Couple

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top