Raza Academy Joining | रझा अकादमीत कार्यकर्ते कसे दाखल होतात? वाचा सविस्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raza-Academy

बंदच्या हिंसक वळणानंतर रझा अकादमी पुन्हा चर्चेत

रझा अकादमीत कार्यकर्ते कसे दाखल होतात? वाचा सविस्तर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला महाराष्ट्रातल्या काही भागात हिंसक वळण लागलं आणि रझा अकादमी पुन्हा एकदा चर्चेत आली. सामाजिक सलोखा बिघडवण्यामागे आणि उसळलेल्या दंगलीमागे रझा अकामदीचा हात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र रझा अकादमीनं सगळे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कुठल्याही हिंसाचाराच्या विरोधात आहोत. राजकारणापोटी आम्हाला टार्गेट केलं जातं, आमच्या संस्थेबद्दल खूप गैरसमजूती परसवल्या जातात, असं स्पष्ट मत रझा अकादमीचे संस्थापक आणि अध्यक्ष सईद नुरी यांनी 'सकाळ'शी बोलताना व्यक्त केलं. त्यासोबतच, रझा अकादमीत कार्यकर्ते कसे दाखल होतात, याबद्दल त्यांनी माहिती दिली.

हेही वाचा: रझा अकादमी अतिरेकी संघटना; दंगलीचं प्लॅनिंग केल्याचा राणेंचा आरोप

'सकाळ'च्या रोहिणी गोसावी यांनी नुरी यांची मुलाखत घेतली. त्यावेळी, रझा अकादमीत कार्यकर्ते कसे दाखल होतात? असा प्रश्न त्यांनी विचारण्यात आला. त्यावर नुरी यांनी नीट माहिती दिली. "रझा अकादमी ही एक वैचारिक संघटना आहे. त्यामुळे आमच्यासोबत यायला आम्ही कुणालाही जबरदस्ती करत नाही. आमचे किती फॉलोअर आहेत, हे आम्हालाही माहीत नाही. कोणतंही काम असेल, तर आम्ही तसं लोकांना आवाहन करतो. ज्यांना आमचे विचार पटतात ते आमच्यासोबत येतात. राज्यात मुंबई, भिवंडी, मालेगाव, जालना अशा जवळपास 35 ते 40 महत्वाच्या ठिकाणी आमच्या शाखा आहेत. त्या शाखांचा वापर आम्ही मदतकेंद्र म्हणून करतो", असे उत्तर नुरी यांनी दिले.

हेही वाचा: Malegaon : दंगल पू्र्वनियोजित? रझा अकादमीच्या कार्यालयावर छापे

Raza-Academy

Raza-Academy

तुम्ही पुकारलेल्या बंदला हिंसक वळण लागलं, त्याची जबाबदारी तुम्ही घेता का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नुरी म्हणाले की सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट ही की रझा अकामदमीने पुकारलेला बंद हा फक्त मुंबईपुरता मर्यादित होता. आम्ही शांततापूर्ण बंदचं आवाहन केलं होतं. नागरिकांनी त्याला प्रतिसाद दिला. राज्यात इतर ठिकाणचा बंद तिथल्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केला होता. त्यामुळे तिथे हिंसक वळण का लागलं?, दंगल का झाली?, कुणी केली?, याबद्दल आम्हाला काही माहीती नाही. पोलिसांनी याची निष्पक्ष चौकशी करावी, दोषीवर गुन्हे दाखल करावेत म्हणजे सत्य समोर येईल, अशी मागणीही नुरी यांनी केली.

हेही वाचा: बंदच्या हिंसक वळणाची जबाबादारी घेता का? रझा अकादमीने दिलं उत्तर

"रझा अकादमी ईश्वराला मानणारी संस्था आहे. दंगे करणं आणि असंतोष पसरवणं हे काम आम्ही कधीच करत नाही. रझा अकादमीला मुद्दाम टार्गेट केलं जातं. आमच्या संघटनेचा आतापर्यंत कोणत्याही दंगलीत समावेश नव्हता आणि नसतो. सामाजिक शांतता, सलोखा निर्माण करणे हा आमच्या संस्थेचा मुख्य उद्देश आहे", असेही त्यांनी स्पष्ट केले.

loading image
go to top