राष्ट्रवादीचे 'हे' बंडखोर आमदार बेपत्ता; कुटुंबाकडून तक्रार दाखल

टीम ई-सकाळ
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

अजित पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांपैकी काही आमदार आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वगृही परतले.

शहापूर (जि. ठाणे) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी बंड केल्यानंतर दिवसभर गदारोळ माजलेला पाहायला मिळाला. राष्ट्रवादीचे बंडखोर नेते अजित पवार हे या बंडखोरीच्या केंद्रस्थानी राहिले.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अजित पवार यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांपैकी काही आमदार आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्वगृही परतले. मात्र, जे आमदार अजूनही नॉट रिचेबल आहेत, त्यांच्यापैकी एका आमदाराच्या मुलाने ते बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनला दाखल केली आहे. 

- शरद पवारांसोबत 51, तर अजित पवारांकडे फक्त 3 आमदार

सत्तासंघर्षाच्या नाटकात एक नवीन वळण मिळाले असून शहापूरचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दौलत दरोडा यांच्यासोबत संपर्क होत नसल्याचे त्यांचा मुलगा करण दरोडा यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेचे माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी आमदार दौलत दरोडा हे मतदारसंघातून बेपत्ता झाल्याची तक्रार शहापूर पोलिस ठाण्यात दिली आहे.

- राष्ट्रवादीचे पाच आमदार अजूनही नॉटरिचेबल!

तत्पूर्वी, दुपारी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस स्वत: अजित पवार यांच्यासह दौलत दरोडा, भाईदास पाटील, बाबासाहेब पाटील आणि धर्मराव बाबा अत्राम हे उपस्थित नव्हते. यापैकी दौलत दरोडा शपथविधी सोहळ्यानंतर गायब झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आले. 

- अजित पवार यांच्या सहा वर्षांतील तीन चुका; राजकीय कारकिर्द धोक्यात?

तर धर्मराव बाबा अत्राम यांनी गडचिरोलीहून पोचण्यास उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण दिले. यापैकी भाईदास पाटील आणि बाबासाहेब पाटील हे दोन आमदार अजित पवारांसोबतच राहणार असल्याची माहिती मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rebel MLA of NCP Daulat Daroda is missing