मोदी सरकारच्या काळात रेकॉर्ड ब्रेक घोटाळे : नवाब मलिक

मोदींचे जवळचे लोक लाखो-करोडो रुपये खाऊन पळून जात आहेत.
PM-Modi-Nawab-Malik
PM-Modi-Nawab-MalikSakal Media

मुंबई : मोदी सरकराच्या काळात रेकॉर्ड ब्रेक घोटाळे झाले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी एबीजी शिपींग (ABG Shipping) कंपनीचा सुमारे 23 हजार कोटी रुपयांचा बँक घोटाळा समोर आल्याचे मलिक म्हणाले. नीरव मोदींचा 13 हजार कोटींचा घोळाला होता याची देखील यावेळी मलिकांनी यावेळी आठवण करून दिली. 23 हजार कोटींच्या बँक घोटाळ्याबाबत 2015 पासून तक्रार दाखल आहे, असे असताना देखील सीबीआयने इतके वर्षे या प्रकरणी गुन्हा का दाखल झाला नाही, असा प्रश्न देखील मलिक यांनी यावेळी उपस्थित केला. (Many Bank Fraud In Modi Government)

PM-Modi-Nawab-Malik
Swara Bhaskar : प्रेम विसरत चाललेल्या देशाला 'व्हॅलेंटाईन डे' च्या शुभेच्छा

मलिक म्हणाले की, जे घोटाळेबाज आहेत त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी का उशीर होतो असा मोठा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. या प्रकरणाबाबत उशीर न झाल्याचे सीबीआयकडून (CBI) जरी सांगणयात येत असले तरी, बँकेच्या तक्रारीनंतर याबाबत सीबीआयने ज्या पद्धतीने सावकाश भूमिका घेण्याची भूमिका घेतली. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. मोदी सरकारच्या काळात जवळपास साडेपाच लाख कोटींचे बँक घोटाळे (Bank Fraud) झाल्याचेही मलिक यांनी यावेळी सांगितले. कोणत्याही आरोपीकडून पैसे वसूल होत नसून काही आरोपी परदेशात लपून बसत आहेत. त्यामुळे आरोपींना नेमके कुणाचे पाठबळ आहे असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे.

PM-Modi-Nawab-Malik
Video: उड़ ने दो मिट्टी को..; शिक्षणमंत्र्यांनी घेतली योगींची शाळा

इन्सेलव्हन्सी कायद्याचा (Insolvency Act) आधार घेऊन बँक लुटण्याचा कारभार देशात मोठ्या प्रमाणात सुरू आहे असा आरोप मलिक यांनी केला आहे. भारतीय पक्षाच्या (BJP) नेत्यांनी पण 1200 कोटींच्या बँका बुडवत त्यानंतर इन्सलव्हन्सी फाईल करत असल्याचे मलिक म्हणाले. त्यानंतर आपण संबंधित बँकेत डायरेक्टर नसल्याचे सांगतात. सीबीआयचे छापे पडतात त्याबाबतीत ईडी गप्प बसत आहे, त्यामुळे बँका बुडवण्यामध्ये बाजपचे नेते, समर्थक या सर्वांना केंद्राचा असलेला पाठिंबा याशिवाय साडेपाच लाख कोटींचा घोटाळा होऊच शकत नाही असे मलिक यांनी स्पष्ट केले.

PM-Modi-Nawab-Malik
MGNREGA : काम केल्यानंतरच मिळणार पैसे, नियम अधिक कडक होणार?

अनेक घोटाळ्यांधमध्ये भाजप नेत्यांचा थेट संबंध असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याचे मलिक म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सांगितले होते की, ना खाऊंगा, ना खाने दूँगा. जनतेला खायला देत नाही, पण मोदींचे जवळचे लोक लाखो-करोडो रुपये खाऊन पळून जात आहेत, याचे उत्तर आता मोदींनी जनतेला दिले पाहीजे, अशी मागणी मलिक यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com