
पुणे - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेला २०१९-२० या वर्षात एक हजार ३४५ कोटी रुपये ढोबळ नफा झाला असून, ३२५ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. राज्य बॅंकेला यंदाही ‘अ’ ऑडिट वर्ग प्राप्त झाला आहे. तसेच, या वर्षात इतिहासात राज्य बॅंकेने पहिल्यांदाच ४१ हजार ६६६ कोटींची उच्चांकी उलाढाल केल्याची माहिती बॅंकेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य सहकारी बॅंकेची १०९वी वार्षिक सभा बॅंकेच्या मुख्यालयात ऑनलाइन पार पडली. व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख या वेळी उपस्थित होते.
अनास्कर यांनी बॅंकेच्या प्रगतीचा वार्षिक आढावा घेतला. अनास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बॅंक आणि नाबार्डच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ टक्के भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) राखणे आवश्यक आहे. त्यावर राज्य बॅंकेने मार्च २०२० अखेर १३.११ टक्के इतके भांडवल पर्याप्तता प्रमाण राखले आहे. या वर्षाअखेर बॅंकेचे नक्त मूल्य (नेटवर्थ) दोन हजार २८२ कोटी असून, बॅंकेचा स्वनिधी चार हजार ७८४ कोटींपर्यंत पोचला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महत्त्वाच्या गोष्टी
बॅंकेच्या प्रगतीची प्रमुख कारणे
राज्य बॅंकेने केवळ जिल्हा बॅंका आणि साखर कारखान्यांपुरते व्यवहार मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व जिल्हा बॅंका, नागरी बॅंका, पतसंस्था, गृहनिर्माण सोसायट्यांसह इतर सहकारी संस्थांसोबत योजना राबविल्या. नागरी सहकारी बॅंकांना सरकारी कर्जरोख्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. तसेच, आरटीजीएस आणि एनइएफटीमार्फत व्यवहारांसाठी पोर्टल, सायबर सिक्युरिटी आणि सीटीएस क्लिअरिंगसारख्या सुविधा दिल्या. तसेच, राज्य बॅंकेने १०९ वर्षातील गाठलेले उच्चांक हे सर्व सभासद, खातेदार, हितचिंतक आणि संपूर्ण सेवक वर्गामुळे साध्य झाल्याचे विद्याधर अनास्कर यांनी सांगितले.
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.