दिलासादायक बातमी! राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला; तब्बल 'इतके' टक्के वाढला रुग्ण बरे होण्याचा दर.. 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 June 2020

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसबाबत आनंदाची बातमी आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार, राज्यात आता कोरोना व्हायरसपासून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसबाबत आनंदाची बातमी आहे. राज्याच्या आकडेवारीनुसार, राज्यात आता कोरोना व्हायरसपासून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

गेल्या 10 दिवसांच्या आकडेवारीनुसार, राज्यात नवीन रुग्णांची नोंद 30 टक्क्यांपर्यंत झाली आहे. तर, बरे होऊन घरी परतललेल्यांचा दर ( रिकव्हरी रेट) 37 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. काही तद्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असून ही एक सकारात्मक बाब आहे. 

हेही वाचा: "गोपीचंद पडळकर यांना मानसोपचाराची गरज"; रुपाली चाकणकर यांचे प्रत्युत्तर.. 

आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, 13 जूनपर्यंत राज्यात 49, 346 रुग्ण कोरोनापासून बरे झाले आहेत. ही संख्या 22 जूनपर्यंत 37 टक्के वाढून 67, 706 वर पोहोचली आहे. याचप्रमाणे, 13 जूनपर्यंत कोरोनाचे 1,04,568 रुग्ण समोर आले होते. ज्यात 30 टक्के वाढ होऊन 22 जूनपर्यंत 1,35,796 रुग्ण समोर आले आहेत. 

संक्रमण रोगाचे विशेषज्ञ आणि कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनी सांगितलं की, मुंबईसह राज्यात कोरोनातून बरे होण्याची संख्या वाढत आहे. मात्र, सोशल डीस्टस्टींग पाळणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईची परिस्थिती सुधारेल. मुंबईकरांनी सोशल डीस्टस्टींग सोबत इतर उपाय आणि काळजी घेणं गरजेचं आहे. जर आता थोडा तरी बेजबाबदारपणा झाला तर कोरोनाची दुसरी लाट यायला उशीर होणार नाही ही भीती ही त्यांनी बोलून दाखवली. 

एकीकडे बरे होण्याचा टक्का वाढत असला तरी कोरोनाच्या सक्रिय केसेसमध्येही फक्त 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार , 13 जून या दिवशी सक्रिय केसेसची संख्या 51, 379 एवढी होती. डाॅक्टरांच्या म्हणण्यानुसार, सक्रिय केसेसमध्ये होणारी वाढ जेवढी कमी असेल तर रुग्णांना रुग्णालयांमध्ये बेड्स उपलब्ध होणं तेवढंच सोपं होईल. ज्यामुळे रुग्णाची गंभीर परिस्थिती होणार नाही. 

हेही वाचा: आता फक्त अर्धा तासात होणार कोरोनाची चाचणी! बृहन्मुंबई महापालिकेने घेतला मोठा निर्णय

"येत्या जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबईची परिस्थिती सुधारेल. फक्त नागरिकांनी सतर्क रहावे. काळजी घ्यावी. आणि सोशल डीस्टस्टींग पाळावं," असं संक्रमण रोगाचे विशेषज्ञ डॉ. ओम श्रीवास्तव यांनी म्हंटलंय.

 राज्याची 10 दिवसांची आकडेवारी: 

recovery rate of corona patients is increased in maharashtra  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: recovery rate of corona patients is increased in maharashtra


तारीख  एकूण रुग्णसंख्या  बरे झालेले रुग्ण 
13 जून 1,04,568 49, 346
22 जून 1,35,796 67, 706