एसटी महामंडळाची चालक-वाहकांची भरती रखडली

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती २०१९ मध्ये जाहीर केली होती.
ST Corporation
ST CorporationSakal
Summary

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती २०१९ मध्ये जाहीर केली होती.

पिंपरी - महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चालक-वाहक सरळसेवा नोकरभरती २०१९ मध्ये जाहीर केली होती. या भरतीच्या माध्यमातून उमेदवारांची लेखी परीक्षा, कागदपत्रे छाननी, तसेच त्यानंतर संगणकीकृत चाचणी व वैद्यकीय तपासणी केली. मात्र, भरती झालेली नाही. २४०० चालक- वाहक या भरतीकडे डोळे लावून बसले आहेत.

उमेदवारांनी ५० गुणांची तळेगाव या ठिकाणी लेखी परीक्षा दिली होती. त्यानंतर, भोसरीतील एसटी वाहन कार्यशाळेत २५ गुणांची संगणकीकृत चाचणी व वैद्यकीय तपासणी २५ गुणांची झाली. संगणकीकृत चाचणी होऊनही परिवहन महामंडळ संगणकीकृत चाचणी राहिल्याचे कारण देत आहे. या संदर्भात ‘सकाळ’ प्रतिनिधीने उमेदवारांशी संपर्क केला असता, संगणकीकृत चाचणी झाली असल्याचे सांगितले. त्यामुळे, चाचणीचा हा सावळा गोंधळ प्रशासनात सुरु असल्याचे समोर आले आहे.

भरती रखडविण्याचे ठोस कारण एसटी प्रशासनाकडे नाही. भरती करावयाची नव्हती, तर एवढा खटाटोप कशासाठी केला. परीक्षेसाठी प्रत्येकाने ५०० रुपये शुल्क भरले आहे. ते तरी माघारी करावे.

- भरती उमेदवार, पिंपरी चिंचवड

टेस्टिंग ट्रॅक हा संगणकीकृत आहे. त्याचे काम बाकी आहे. कोरोनामुळे ते रद्द केले होते. सध्या ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरु आहे. अद्याप भरतीसाठी किती दिवस लागतील, सांगता येणार नाही.

- रमाकांत गायकवाड, पुणे विभाग नियंत्रक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com