राज्यात १३ हजार अंगणवाड्यांमध्ये मदतनीस पदांची भरती! मदतनीस म्हणून घेण्यासाठी सोलापुरातील दोघांनी दिले थेट मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र

अंगणवाडीतील मदतनीस पदासाठी अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी थेट मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले आहे. जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम व अटीच्या अधीन राहून त्या अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठविले आहे.
anganwadi
anganwadisakal

सोलापूर : अंगणवाडीतील मदतनीस पदासाठी अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेतील महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकाऱ्यांनी भरतीचे नियम व अटीच्या अधीन राहून त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे पत्र तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयास पाठविले आहे.

राज्यात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली असून ७५ हजार पदांच्या शासकीय मेगाभरतीतील अनेक परीक्षा झालेल्या नाहीत. तलाठ्यांसह अनेक परीक्षांचे निकाल प्रलंबित असून आरक्षणातील बदलामुळे नव्याने होणारी पदभरती थांबली आहे. त्यामुळे अनेकजण किरकोळ नोकरीसाठी देखील मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांचे शिफारस पत्र आणत आहेत. दरम्यान, गावातच आपल्या कुटुंबातील महिलेला नोकरी मिळावी म्हणून अकलूज व माळशिरस येथील दोन उमेदवारांनी मुख्यमंत्र्यांचेच शिफारस पत्र आणले. ते शिफारस पत्र जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे आले. त्यानंतर महिला व बालकल्याण विभागाने यापूर्वी त्या दोन्ही ठिकाणी मदतनीस पद रिक्त नसल्याचे संबंधितांना कळविले. पण, आता मदतनीस पदांची भरती सुरू झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या शिफारस पत्रानुसार त्या दोन्ही अर्जांचा प्राधान्याने विचार करावा, असे तालुक्याच्या प्रकल्प अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ९०१ मिनी अंगणवाड्यांसह राज्यभरातील १३ हजार सात मिनी अंगणवाड्या आता मोठ्या होणार आहेत. त्यामुळे या सर्वच अंगणवाड्यांमध्ये आता नव्याने मदतनीस पदे भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. गावागावांतील इयत्ता बारावी उत्तीर्ण १३ हजार तरुणींसह महिलांना त्याठिकाणी नोकरीची संधी मिळणार आहे. तालुका स्तरावरील प्रकल्प कार्यालयात अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

नव्याने मदतनीस भरती होणार

जिल्ह्यातील साधारत: ९०१ मिनी अंगणवाड्या आता मोठ्या करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्याठिकाणी सध्या कार्यरत मदतनीस महिलेला सेविका म्हणून पदोन्नती दिली जाईल आणि नव्याने मदतनीस भरती होणार आहे. तालुक्याच्या प्रकल्प कार्यालयाकडून भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

- प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जिल्हा परिषद, सोलापूर

पर्यवेक्षक भरतीसंदर्भात निर्णय होईना

२५ ते ३० अंगणवाड्यांसाठी एक पर्यवेक्षक नेमला जातो. सोलापूर जिल्हा परिषदेतील बालकल्याण विभागाअंतर्गत चार हजार ७६ अंगणवाड्या आहेत. त्यांच्यावरील देखरेखीसाठी सध्या ९२ पर्यवेक्षिका कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अंगणवाड्यांच्या प्रमाणात १३५ पर्यवेक्षिका जरुरी असून अद्याप ४३ पदे रिक्त आहेत. या पदभरतीसंदर्भातील निर्णय अजूनही प्रलंबित असून काही दिवसांत त्या पदांचीही भरती होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com