ट्रम्प आणि एलियन्सची युती? इस्त्राईलच्या माजी अंतराळ प्रमुखांचा धक्कादायक दावा

Aliens_Donald_Trump
Aliens_Donald_Trump

जेरुसलेम : इस्राईलचे माजी अंतराळ संरक्षण प्रमुख यांनी केलेल्या दाव्यामुळे एलियन्स यांच्या अस्तित्वाबद्दल पुन्हा चर्चेला उधाण आले आहे. 87 वर्षीय हैम इशेदने असा दावा केला आहे की, वास्तविकदृष्ट्या एलियन्स या सृष्टीमध्ये आहेत आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना हे माहित आहे. 

ते पुढे म्हणाले, अमेरिका आणि इस्राईल एलियन्सच्या संपर्कात आहेत. त्यांच्याबाबत लोकांना माहिती व्हावी, अशी इच्छा एलियन्सची नाही. कारण मानव ते जाणून घेण्यासाठी आणखी तयार झालेला नाही. एलियन आणि अमेरिकी सरकार यांच्यात करार झालेला आहे, असंही इशेद यांनी स्पष्ट केलं.

हैम इशेद जवळपास तीन दशकांहून अधिक काळ इस्त्राइलच्या अंतराळ सुरक्षा कार्यक्रमाचे प्रमुख राहिले आहेत. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्यांनी असा दावा केला आहे की, गॅलेक्टिक फेडरेशन (आकाशगंगा महासंघ) तयार केला आहे. एलियन्स आणि अमेरिकी सरकार यांच्यात झालेल्या करारानुसार एलियन्स अमेरिकेच्या मदतीने विश्व समजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. आणि त्यावर संशोधन करत आहेत. या अभियानांतर्गत मंगळावर एक गुप्त भूमिगत तळही तयार करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डोनाल्ड ट्रम्प एलियन्स यांच्याविषयीची माहिती उघड करणार होते, पण एलियन्सनी त्यांना असे करण्यापासून रोखले. कारण त्यांच्याबाबत जाणून घेण्याइतपत मानव तयार झाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. जोपर्यंत मानव विकसित होऊन अंतराळ, अंतराळयान आणि त्याच्याशी संबंधित रहस्य यांविषयी स्वत: समजून घेण्याच्या स्तरापर्यंत पोहचू शकत नाही, तोपर्यंत एलियन्स लोकांसमोर येणार नाहीत. 

इशेद पुढे म्हणाले की, जर पाच वर्षांपूर्वी हा खुलासा केला असता, तर मला हॉस्पिटलमध्ये भरती केले असते. त्यांनी आपल्या पुस्तकात असेच काही धक्कादायक दावे केले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, इशेद यांच्या दाव्याबद्दल अमेरिकी सरकार आणि डोनाल्ड ट्रम्प यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इशेद यांच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर एलियन्सच्या अस्तित्वाबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. इतकेच नाही, तर मीम्सही खूप व्हायरल होत आहे.

- ग्लोबल संबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com