छत्रपतींच्या प्रत्येक गादीविषयी आदर, भाजपने माफी मागावी : संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

पुण्यात बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजे भोसले यांनी दाखवून द्यावे,'' असे म्हणत थेट आव्हान दिले होते. शिवाजी महाराज हे कोणाच्या कुटुंबाचे नाही तर, अवघ्या राज्याचे दैवत आहे, असेही राऊत यांनी म्हटले होते.

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहेत. तसेच आम्हाला शिवाजी महाराजांच्या प्रत्येक गादीविषयी आदर असल्याचे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुण्यात बुधवारी झालेल्या एका कार्यक्रमात संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे उदयनराजे भोसले यांनी दाखवून द्यावे,'' असे म्हणत थेट आव्हान दिले होते. शिवाजी महाराज हे कोणाच्या कुटुंबाचे नाही तर, अवघ्या राज्याचे दैवत आहे, असेही राऊत यांनी म्हटले होते. दरम्यान, शिवाजी महाराज यांच्या वंशजाबाबत राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद जोरदार उमटण्यास सुरवात झाली आहे. भाजप नेत्यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

उद्धव ठाकरे तुमच्या नेत्यांना आवरा नाहीतर... : मराठा क्रांती मोर्चा

संजय राऊत यांनी या टीकांनी ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय राऊत म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींची प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती ऊदयन राजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला. हा शिवरायांच्या वंशजांचा अपमान आहे. त्याबद्दल भाजप शिवरायांच्या वंशजांची व महाराष्ट्राची माफी मागेल काय?

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे उद्या पहिल्यांदाच बारामतीत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Respect for every throne of Chhatrapati BJP should apologize