
Rohini Khadse: पुण्यात खराडी परिसरात रेव्ह पार्टी प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं २ महिला आणि ५ पुरुषांना अटक केली. या प्रकरणात शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांची पती प्रांजल खेवलकर यांनाही अटक झालीय. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्रांजल खेवलकर यांनीच ३ दिवसांसाठी हॉटेलच्या तीन रूम बूक केल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिलीय. आता या प्रकरणी रोहिणी खडसे यांनी अटकेच्या कारवाईनंतर ३० तासांनी प्रतिक्रिया दिलीय.