बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाची RSS ला अडचण? संघाचं BMC ला पत्र

RSS Claim on Shivaji Park Land
RSS Claim on Shivaji Park Lande sakal

मुंबई : शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला आहे. त्यातच आरएसएसने नवीन दावा केला आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. शिवाजी पार्कमधील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळाच्या भूखंडाजवळ आरएसएने (RSS Claim on Shivaji Park Land) दावा केला आहे. याबाबत संघाने महापालिकेला पत्र (RSS Letter To BMC) पाठवले.

RSS Claim on Shivaji Park Land
शिवसेना म्हणजे 'ढ' सेना, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल

महापालिकेनं १९६७ सालापासून संबंधित भूखंड संघाला भाडेतत्वावर दिला होता. संघानं २००७ पर्यंत या भूखंडाचं भाडं भरलंय. या भूखंडावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मृतीस्थळ आहे. दिवसेंदिवस त्याची व्याप्ती वाढत असल्यामुळे संघाची शाखा भरविण्यात अडचण येत आहे, असा दावा या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे शिवाजी पार्कमध्ये पर्यायी मोकळा भूखंड संघाला देण्यात यावा, अशी मागणी संघानं केली आहे. याबाबत एबीपी माझानं वृत्त दिलं आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय? -

  • शिवाजी पार्कमधील १७५५ चौरस मीटर मोकळ्या भूखंडाचा भाडेपट्टा १९६७ पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आहे.

  • संघाने १९६७ पासून २००७ पर्यंत मोकळ्या भूखंडाचे भाडे भरलेले आहे.

  • २००८ पासून आरेखन न झाल्यामुळे प्रशासकीय कामामुळे भूभाडे थकीत

  • आरेखन करण्यासाठी आग्रह धरूनही आजपर्यंत आरेखन केलेलं नाही.

  • १९३६ पासून शिवाजी पार्क मैदानात आरएसएसच्या दैनंदिन शाखा

  • सध्या या भूखंडावर स्मृतीस्थळ असल्यामुळे संघाच्या ताब्यातील भूखंडावर उपक्रम राबविण्यास अडचण, असा दावा संघाने केला आहे.

  • शिवाजी पार्क मैदानाजवळच्या नाना नानी पार्कजवळचा मोकळा भूखंड आरएसएसला द्यावा, अशी मागणी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com