esakal | Exclusive: आरटीओत 'जीफॉर्म'च्या कोडवर्डला भष्टाचाराचा 'पासवर्ड'
sakal

बोलून बातमी शोधा

rto

Exclusive: आरटीओत 'जीफॉर्म'च्या कोडवर्डला भष्टाचाराचा 'पासवर्ड'

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद: आरटीओ कार्यालयात लाचेच्या प्रकरणानंतर आरटीओच्या भ्रष्टाचाराचे सुरस प्रकरणे समोर येत आहेत. वाहन परवाना देण्यासाठी थेट दरपत्रकच ठरवलेले होते. त्यामुळे महिन्याकाठी यातून लाखो रुपयांची वरकमाई अधिकारी करत होते, असे सूत्रांनी सांगितले. विशेष म्हणजे यासाठी जीफॉर्म असा कोडवर्ड वापरून ही लाचेची रक्कम जणू हक्काची असल्याच्या आविर्भावात उकळली जात होती.

भष्टाचाराने बरबटलेल्या आरटीओ कार्यालयाच्या सुरस कथा आहेत. मोटार वाहन निरीक्षकांच्या मासिक नेमणुकीतून ८५ लाख रुपयांच्या वरकमाई करण्यात येत असल्याची तक्रार नाशिक येथील मोटार वाहन निरीक्षकाने केल्यानंतर सरकार हादरलेले आहे. तोच प्रत्यय विविध आरटीओ कार्यालयाच्या कामकाजातून आल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे. औरंगाबाद आरटीओ कार्यालयातील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील माने व त्यांच्या सहायकाला लाचेची रक्कम घेताना मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने कारवाई केली. यामध्ये दोघांनाही अटक केली, त्यामुळे पुन्हा एकदा आरटीओच्या भ्रष्टाचाराचा मुद्दा चव्हाट्यावर आलेला आहे.

हेही वाचा: दुर्दैवी! आजोळी आलेल्या श्रावणीचा पावसाने अंगावर भिंत पडल्याने मृत्यू

कुठे आहे जीफॉर्म
जीफॉर्म म्हणजे भ्रष्टाचाराच्या रकमेचा कोडवर्ड आहे. कुठे आहे जीफॉर्म असा सहज प्रश्न आरटीओ अधिकारी उच्चारत असतात. विशेष म्हणजे सामान्य माणसांना ही भाषा कळत नाही. जीफॉर्म म्हणजे एखादा फॉर्म असेल असा साधारण समज असू शकतो, मात्र ही जीफॉर्म म्हणजे ठरलेल्या थेट रकमेची मागणी असते. ही मागणी केल्यानंतर जीफॉर्मची कारवाई पूर्ण झाल्याशिवाय पेपरवर स्वाक्षऱ्या होतच नाहीत, ही परिस्थिती आहे.

असा होता वरकमाईचा दर
मोटार ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक उमेदवाराच्या मागे शासकीय शुल्क व्यतिरिक्त वाहन चाचणी घेणारा मोटार वाहन निरीक्षक आणि अंतिम मंजुरी देणारा सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांची ही वरकमाईची रक्कम ठरलेली असते. ही रक्कम मिळाली नाही तर वाहन परवाना अडवून ठेवला जातो. ही रक्कम पाहिल्यानंतर डोळे पांढरे झाल्याशिवाय राहत नाहीत. वाहन परवाना (पक्का) कार, ट्रान्स्पोर्ट, अवजड वाहन, दुचाकी, तीनचाकी अशा कुठल्याही एका क्लासच्या परवान्यासाठी केवळ सातशे ते आठशे रुपये शासकीय शुल्क आहे.

हेही वाचा: लातूर महापालिकेची मोठी कारवाई; २६ दुकाने केली सील

अशी आहे वरकमाई
क्लास मोटार वाहन निरीक्षक एआरटीओ एकूण
कार २०० रुपये २०० रुपये ४०० रुपये
कार ट्रान्स्पोर्ट ३०० रुपये ३०० रुपये ६०० रुपये
अवजड वाहन ६०० रुपये ६०० रुपये १२०० रुपये
दुचाकी १०० रुपये १०० रुपये २०० रुपये

loading image