'सिनेमा बनवला,पैसे कमावले; त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते' | Rupali Chakankar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rupali Chakankar.
'सिनेमा बनवला,पैसे कमावले; त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते'

'सिनेमा बनवला,पैसे कमावले; त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते'

मुंबई : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या आणि प्राणांची आहुती दिलेल्या प्रत्येकाचा हा अपमान आहे. ज्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या नावे सिनेमा बनवला, पैसे कमावले. त्या खाल्ल्या मिठाला तरी जागायचे होते, अशी टीका राष्ट्रवादी पक्षाच्या (NCP) नेत्या तथा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अभिनेत्री कंगना राणावतवर केली आहे. त्या आपल्या ट्विटमध्ये पुढे म्हणतात, की देशाची एकता, अखंडता आणि अस्मिता यामध्ये फूट पाडणाऱ्या कंगना राणावतचा (Kangana Ranaut) पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने काढून घ्यावा आणि तिच्यावर देशाद्रोहाचा गुन्हा दाखल करुन आपण अशा देशद्रोह्यांना पाठीशी घालत नाही हे केंद्र सरकारने सिद्ध करावे, अशी मागणी चाकणकर यांनी मोदी सरकारकडे केली आहे.

हेही वाचा: कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अमोल मिटकरींची मागणी

हिच मागणी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही केली आहे. टाईम्स नाऊच्या कार्यक्रमात कंगना राणावत हिने २०१४ मध्ये देशाला स्वातंत्र्य मिळाल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्यावरुन कंगनावर टीका होत आहे.

loading image
go to top