'काय योगायोग? परमबीर, गोस्वामी, वानखेडे, रश्मी शुक्लांना दिलासा पण...'

आता काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
'काय योगायोग? परमबीर, गोस्वामी, वानखेडे, रश्मी शुक्लांना दिलासा पण...'

मागील काही दिवसांपासून राज्यांत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावरील ईडीच्या (ED) कारवाईमुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात टोलेबाजी झाली आहे. आज CRPF च्या महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. 25 मार्चपर्यंत त्यांच्यावर कुठलीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिला आहेत. दरम्यान, यावरून आता काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे.

ते ट्विटमध्ये म्हणाले, 'काय योगायोग', परमबीर सिंग, अर्णब गोस्वामी, समीर वानखेडे, आता रश्मी शुक्ला या सर्वांना अटकेतून दिलासा मिळाला आहे. तर, अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे तुरुंगात आहेत", असं ट्विट करत सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

'काय योगायोग? परमबीर, गोस्वामी, वानखेडे, रश्मी शुक्लांना दिलासा पण...'
अटक टळताच रश्मी शुक्लांविरोधात आणखी एक गुन्हा ; अडचणीत वाढ

दरम्यान, आजच शुक्ला यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court ) 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. मात्र त्यानंतर मुंबई पोलिसांनी शुक्ला यांच्या विरोधात टेलिग्राफ कायद्यांतर्गत आणखी एक गुन्हा दाखल केल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com