भाजपने हनुमान चालिसातील दोह्यांचं विडंबन करून अपमान केला : सचिन सावंत

भाजपाची उत्तर सभा सुरू होण्यापूर्वी हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं होतं.
Sachin Sawant - Devendra Fadnavis
Sachin Sawant - Devendra FadnavisSakal

मुंबई : काल मुंबईत भाजपाची उत्तर सभा पार पडली. त्याअगोदर १४ मे राजी शिवसेनेची जैहीर सभा पार पडली होती. त्या सभेला उत्तर म्हणून भाजपाकडून ही सभा आयोजित करण्यात आली होती. भाजपाची उत्तर सभा सुरू होण्यापूर्वी हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं होतं. यावेळी भाजपा नेत्यांनी हनुमान चालिसातील दोह्यांचे विडंबन करुन हनुमानजींचा अपमान केला असल्याचं ट्वीट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाचा निषेध केला आहे.

(Sachin Sawant On Devendra Fadnavis Sabha)

काल मुंबईत भाजपाची उत्तर सभा पार पडली. यावेळी भाजपाचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. मात्र सभा सुरू होण्यापूर्वी भाजपाकडून हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं होतं. त्यादरम्यान भाजपाच्या नेत्यांनी आणि फडणवीसांनी हनुमान चालिसाचं विडंबन करून हनुमानजींचा अपमान केला आहे असं म्हणत दोन ट्वीट केले आहेत.

Sachin Sawant - Devendra Fadnavis
भाजप प्रवक्त्याला मारहाण; राष्ट्रवादीच्या चौघांविरूद्ध गुन्हा दाखल

सचिन सावंत आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्यांनी फडणवीसांनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा उल्लेख केला आहे. "आम्ही आता हनुमाच चालीसाचं पठण केलं आहे. या वानरसेनेला घेऊन आता लंकादहन करणार आहोत." असं फडणवीस कालच्या सभेत म्हटले होते. तसेच "ती कौरवांची सभा होती ही पांडवांची सभा आहे, भाजपा कार्यकर्ते पांडवसेना आहे. आम्ही या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली पाडणार आहोत." असं फडणवीस कालच्या भा।णात म्हणाले होते. हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले की, हे फडणवीस साहेबांचे भाषण की "जाने मी दो यारों" चित्रपट, आणि उत्तर भारतीयांसाठी या सभेत काहीच नाही? असा सवाल करत सावंतांनी भाजपाला टोला लावला आहे.

Sachin Sawant - Devendra Fadnavis
व्हिडीओ गेम मुलांची बुद्धिमत्ता वाढवण्यास करतात मदत; अहवालातून समोर

दरम्यान काल भाजपाने उत्तर सभा घेत शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. सभा सुरू होण्याच्या अगोदर उत्तर भारतीयांनी एकत्र येऊन "जय जय महाराष्ट्र माझा" हे गीत गायले होते त्यानंतर हनुमान चालिसाचं पठण करण्यात आलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com