
राज्यात मालवण घटनेवरून आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यातच देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटलं नव्हत्याचे वक्तव्य केले आहे. त्यानंतर पुन्हा राजकारणात चर्चांना उधाण आले. त्यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांनी देवेंद्र फडणवीसांना घेरलं होतं. आता यावर सचिन सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करत निशाणा साधला आहे.