शरद पवारांनी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये- सदाभाऊ खोत

पालकमंत्री जातीयवादाचे राजकारण करत आहेत -सदाभाऊ खोत
Sadabhau Khot
Sadabhau KhotEsakal

सांगली : राजमाता अहिल्यादेवी होळकर (Ahilyabai Holkar) या बहुजन समाजाच्या मार्गदर्शक होत्या. तुमचे प्रेम जर उत्तू जात असेल तर 'एसटी'च्या सवलती का लागू केल्या नाहीत? राजकिय आरक्षण का घालवल असा सवाल याठिकाणी जमलेल्या मेंढपाळ समाजाचा आहे. सत्तेचा वापर करून लोकभावनेला हात घालण्याचे काम सरकारने केले आहे अशी टीका रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष, आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करताना सदाभाऊ म्हणाले, पवार साहेबांना उद्घाटन करायचे आहे तर विकासकामांचे करा. तरूणाच्या हाताला काम मिळू दे. जाणीवपूर्वक लोकप्रतिनिधीला विश्वासात न घेता राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका तो मान्य केला जाणार नाही अशा शब्दात टीकास्त्र सोडले. पुढे ते म्हणाले, आतापर्यंत तुम्ही किती नारळ फोडले. अजून बालअट्टाहास का करताय? सामान्य मेंढपाळाच्या हस्ते नारळ फोडताना तुमच्या पोटात कळ का सुटतेय असा प्रश्नही त्यांनी विचारला. प्रशासन म्हणतयं परवानगी नाही. मग दोन तारखेला कशी परवानगी दिली. बहुजन समाजाच्या नेत्याचे नाव पत्रिकेत नाही. जे वारसा चालवतात त्यांच नाव नाही. पालकमंत्री जातीयवादाचे राजकारण करत आहेत असा आरोप जयंत पाटलांवरही सदाभाऊंनी केला.

Sadabhau Khot
"मेंढपाळाच्या हस्तेचं करणार लोकार्पण"; पडळकर अहिल्यादेवींच्या स्मारकाकडं रवाना

सरकारवर निशाणा साधताना सदाभाऊ म्हणाले, सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले जात आहे हे कदापी सहन करणार नाही. आंदोलन करणे, तुरुंगात जाणे आमच्यासाठी नविन नाही. पंढरीच्या वारीप्रमाणे आमची जेलची वारी असते. म्हणूनच दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com