
राज ठाकरे यांच्या मागणीवरुन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली
'गणपती, नवरात्रीत लावल्या जाणाऱ्या डीजेमुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का?'
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी आझानसाठी मशिदींवर लावण्यात येणाऱ्या भोंग्यांवर आक्षेप घेतला. राज ठाकरेंनी प्रखर हिंदुत्ववादाची भूमिका मांडत मशिदींवरील भोंगे उतरवा, अशी मागणी केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याचे भाजप नेत्यांनी समर्थन केलं आहे. मात्र आता राज ठाकरे यांच्या या मागणीवरुन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हिंदू सणांचा संदर्भ देत त्यावेळी वाजवण्यात येणाऱ्या डीजेमुळेही ध्वनिप्रदूषण होते असा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे आता यावरुन त्यांच्यावर टीका होण्याची शक्यता आहे. (Abu Azmi on Raj Thackeray)
हेही वाचा: 'महाआघाडी सरकार कोर्टाच्या आदेशांची अमंलबजावणी का करत नाही'
राज ठाकरे यांनी मशिदींवर असणारे भोंगे काढून टाका अशा इशारा राज्यसरकारला दिला होता. यावर अबु आझमी म्हणाले, मशिदींवरील भोंग्यामुळे ध्वनिप्रदूषणाची तक्रार असेल तर गणपती, नवरात्री, विवाह समारंभात लावले जाणारे डीजे यामुळे ध्वनिप्रदूषण होत नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. पण आम्ही कधी याबाबत तक्रार केली नसून केवळ निवडणुका आणि मतांच्या राजकारणासाठी राज ठाकरे हिंदू-मुस्लिमांमध्ये वैर किंवा भांडणे लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही आझमी म्हणाले आहेत. त्याचप्रमाणे जनता राज ठाकरेंच्या या भूमिकेला थारा देणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढले नाही तर मशीदींसमोर भोंग्यांवर हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. यावरही आझमी म्हणाले की, मशिदींपुढे हनुमान चालिसा लावणाऱ्यांनाही आम्ही थंड पाणी, सरबत देऊ, धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण आम्हाला नको आहे. वेगवेगळे उत्सव व विवाह समारंभातील डीजेंमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावरून राज ठाकरे यांनी कधी आवाज उठविला नाही, असा आक्षेपही आझमी यांनी घेतला आहे.
हेही वाचा: 'महाआघाडी सरकारच्या महसुल खात्याचं नाव आता वसुली खाते करावं'
Web Title: Samajwadi Abu Azmi Questions Ganpati Festival Dj Voice Create Noise Pollution
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..