'सर्व खासदारांना एकत्र करणार, वटहुकुमासाठी पंतप्रधानांना भेटणार'

संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता. दोन) येथे मराठा आरक्षण जनसंवाद झाला
sambhajiraje
sambhajirajesambhajiraje
Updated on

बीड: सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाचे आरक्षण रद्द केल्यानंतर केंद्र सरकारने दाखल केलेली फेरआढावा याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता मोठी कसोटी आहे. पक्षविरहित सर्वांनी एकत्र येऊन केंद्रापर्यंत आवाज पोचवावा लागेल. यासाठी नेतृत्वच नाही तर पुढाकार घेणार असल्याचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. केंद्राने वटहुकूम काढून घटनेत दुरुस्ती करावी, यासाठी सर्व खासदारांना एकत्र करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याचे ते म्हणाले.

संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मोर्चाच्या पुढाकाराने शुक्रवारी (ता. दोन) येथे मराठा आरक्षण जनसंवाद झाला. त्यावेळी ते बोलत होते. संयोजकांसह विविध पक्षांच्या वतीने शहरात संभाजीराजे यांचे जंगी स्वागत झाले. क्रेनच्या माध्यमातून त्यांना भव्य हार घालून पुष्पवृष्टी करण्यात आली. ‘समाजाला रस्त्यावर आणू नका. त्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समाजासाठी काय करणार ते सांगा. आता केवळ राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नाही. मागासवर्ग आयोगाकडून समाजाचे फेरसर्वेक्षण करायला हवे. समाजाचा मागासवर्ग प्रवर्गात समावेशाच्या शिफारशीचा अभ्यासपूर्ण अहवाल सादर होणे गरजेचे आहे, असे संभाजीराजे म्हणाले.

sambhajiraje
Exclusive: 'राज्य आणि केंद्र सरकारच्या लसींच्या राजकारणात हजारो लोकांचा बळी'

तरुणांना आवाहन-
आरक्षणातून समाजाला मिळणार आहे तितकेच सारथीच्या माध्यमातून मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाच्या घोषणा आणि माझ्यासोबत फोटो काढण्यापेक्षा तरुणांनी सारथीच्या योजनांचा अभ्यास करावा, योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करून सारथीला सहाशे कोटी रुपये मिळतील, असा विश्वास संभाजीराजेंनी व्यक्त केला.

समाजाच्या मागण्यांसाठी पुढाकार घेणाऱ्यांचे स्वागत आहे. पण, त्यांनी पर्याय सांगावा. समाजाला वेठीस धरू नये. मी चुकत असेन, खोटं बोलत असेन तर तेही सांगावे.
- संभाजीराजे छत्रपती, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur
vande mataram
solapur issues of voters
Operation Tiger
Marathi News Esakal
www.esakal.com