'संभाजीनगर'चे खासदार जलील नामांतरावरून आक्रमक; म्हणाले औरंगाबाद हेच... | Imtiyaj Jaleel | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Imtiaz Jaleel

'संभाजीनगर'चे खासदार जलील नामांतरावरून आक्रमक; म्हणाले औरंगाबाद हेच...

औरंगाबाद : महाविकास आघाडी सरकारने २९ जून रोजी मंत्रिमंडळाची बैठक घेत औरंगाबाद (Aurangabad) आणि उस्मानाबाद (Osmanabad) शहराच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. त्यानंतर थोड्याच वेळात महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या सर्व घडामोडीनंतर शिवसेनेशी बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) भाजपसोबत सरकार स्थापन केले आणि दुसऱ्या दिवशी (३० जून) शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

(Sambhajinagar City News)

महाविकास आघाडी सरकारने आपलं सरकार कोसळण्याच्या काही तास अगोदर तब्बल १० निर्णय घेतले. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयाच्या यादीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचे नामांतर करून अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण करण्यास मंजूरी दिली आहे. पण या निर्णयाला संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांनी जोरदार विरोध दर्शवला आहे. शहराचे नाव बदलून काय साध्य करणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर या नामांतराच्या विरोधासाठी एकत्र येण्यासाठी त्यांच्याकडून सर्व पक्षांना मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा: Shikhar Dhawan | विंडीज दौऱ्यात शिखर धवन असणार टीम इंडियाचा कर्णधार

दरम्यान जलील यांनी संभाजीनगर मध्ये काही नेत्यांची सभा घेतली. या सभेत आपण सर्व धर्माच्या नेत्यांना, पक्षाच्या नेत्यांनाही पत्र पाठवले आहे. गुरूद्वाराचे अध्यक्ष, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष, आंबेडकरी विचारी चळवळीचे प्रमुख नेते अशा महत्त्वाच्या नेत्यांना पत्र पाठवून सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यास मागणी केली आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा: Maharashtra Rain Update : येत्या ४, ५ दिवसांत विदर्भ, मराठवाड्यात जोरदार पाऊस

माझ्या जन्मपत्रावर देखील औरंगाबाद हेच नाव असेल आणि माझ्या मृत्यूपत्रावर देखील हेच नाव असेल असं त्यांनी या सभेत म्हटलं आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या वेळी आपण शांत राहिलो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला नक्कीच विचारेल की, जेव्हा या शहराचं नामांतर होत होतं, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा. माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून मला मृत्यू देखील औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर औरंगाबाद आहे तर डेथ सर्टिफिकेटवरही औरंगाबादच असायला हवं, असही जलील यांनी म्हटलं आहे.

Web Title: Sambhajinagar Name Aurangabad Mp Imtiyaj Laleel Aggressive

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..