Vidhan Sabha 2019 : एकाच उमेदवाराला दोन पक्षाकडून तिकीट जाहीर

टीम ई सकाळ
Tuesday, 24 September 2019

एकाच उमेदवाराला दोन पक्षाच्या तिकीटाची लॉटरी लागली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव यांना आज (ता.24) वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, काल आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या यादीतही त्यांचे नाव आहे.

पुणे :  एकाच उमेदवाराला दोन पक्षाच्या तिकीटाची लॉटरी लागली आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातून डॉ. आनंद गुरव यांना आज (ता.24) वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, काल (ता.23) आम आदमी पक्षाने जाहीर केलेल्या यादीतही त्यांचे नाव आहे.

वंचितची पहिली यादी जाहीर

वंचित बहुजन आघाडीने आज जाहीर केलेल्या यादीत दुसऱ्या नंबर वरती करवीर विधान सभेसाठी डॉ. आनंद गुरव यांचे नाव आहे. एकाच उमेदवाराला दोन पक्षाकडून उमेदवारी जाहीर केल्याने आनंद गुरव यांनी लॉटरी लागली असल्याची चर्चा सध्या सरु आहे.

आपची पहिली यादी जाहीर

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने आज विधानसभेसाठी एकूण 22 उमेदवारांची यादी जाहीर केली असून उमेदवारांच्या जातीच्या उल्लेखासह ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: same candidate has to declare a ticket from two parties in Vidhan sabha election 2019