"तपास यंत्रणा चुकत असतील तर न्यायव्यवस्था त्यांना फोडून काढेल"

सरकार ड्रग्ज प्रकरणातील तरुणाला वाचवण्याचं काम करतेय असंही ते म्हणाले.
Sameer Wankhede
Sameer WankhedeTeam eSakal

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीवर झालेल्या गंभीर आरोपानंतर हे प्रकरण आता एका वेगळ्या वळणारवर येऊन ठेपल्याचं पाहायला मिळाला आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनीही या प्रकरणात आपण कोणत्याही चौकशीला समोर जायला तयार असल्याचं सांगितलंय. महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. त्यातच आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. तसेच तपास यंत्रणा चुकत असतील न्यायव्यवस्था निर्णय घेईल असंही ते म्हणाले.

एनसीबीच्या कारवाईनंतर निर्माण झालेल्या या वादावर बोलताना भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ड्रग्सचा आरोप असलेल्या तरूणाला वाचवण्यासाठी राज्य सरकार सगळी शक्ती पणाला लावतंय असा आरोप त्यांनी केला आहे. संजय राऊत यांनी एनसीबीवर केलेल्या आरोपांवर ते म्हणाले की, या राज्यातल्या तरुणांना दीशा देण्याची जबाबदारी आहे, ते या ड्रग्ज प्रकरणातील तरुणाला वाचवताय, आणि केंद्रीय यंत्रणांना दोष देण्याचं काम करताय असंही ते म्हणाले. ड्रग्जमुळे महाराष्ट्र देश बदनाम होतो त्यांचं यांना घेणं देणं नाही, आणि महाराष्ट्र बदनाम होण्याबद्दल बोलताय असंही ते म्हणाले.

Sameer Wankhede
''समीर दाऊद वानखेडे'', नवाब मलिकांनी शेअर केला जन्माचा दाखला

केंद्रीय तपास यंत्रणांवर झालेल्या आरोपांवर ते म्हणाले की, "जर तपास यंत्रणांनी चुकीचं काम केलं तर न्यायव्यवस्था न्यायाच्या चाबकाने त्यांना फोडून काढेल." दरम्यान, आज या प्रकरणात एनसीबीवर गंभीर आरोप केलेल्या प्रभाकर साईलने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आणखी काय गोष्टी समोर येतात हे पाहावं लागणार आहे.

Sameer Wankhede
प्रभाकर साईलच्या धाडसाचं कौतुक; पिक्चर अभी बाकी है! - संजय राऊत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com