समीर वानखेडेंना दिलासा; जन्माने मुस्लीम नाहीत, समितीचा निकाल

समीर वानखेडेंच्या विरोधात खोटं जात प्रमाणपत्र दाखवल्याची तक्रार करण्यात आली होती.
Sameer Wankhede
Sameer Wankhedeesakal

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात चर्चेत आलेले समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काही गंभीर आरोप केले होते. वानखेडे जन्माने मुस्लीम आहेत आणि त्यांनी बोगस जात प्रमाणपत्र सादर करून मागासवर्गीय कोट्यातून सरकारी नोकरी मिळवल्याचा दावाही केला होता. या प्रकरणात आता वानखेडेंना दिलासा मिळाला आहे.

या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या अंतर्गत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी समिती करत होती. या समितीचा निकाल समीर वानखेडेंच्या बाजूने लागला आहे. समीर वानखेडे जन्माने मुस्लीम नाहीत. वानखेडेंच्या वडिलांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लीम धर्माचा स्विकार केल्याचं सिद्ध होत नाही, असं समितीने म्हटलं आहे.

समीर वानखेडे हिंदू महार ३७ अनुसुचित जातीचे सिद्ध होत असल्याचं समितीने म्हटलं आहे. तसंच समीर वानखेडेंविरोधात केलेली तक्रार सिद्ध होत नसल्याने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ही तक्रार फेटाळली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com