''चौकशी होईपर्यंत समीर वानखेडेंना पदावर राहण्याचा अधिकार नाही''

samir wankhede
samir wankhedegoogle

मुंबई : आर्यन खान प्रकरणातील (aryan khan case) पंच प्रभाकर साईलने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे (NCB Officer sameer wankhede) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यानंतर महाविकास आघाडीतील मंत्री नवाब मलिक (minister nawab malik) अधिक आक्रमक झाले असून ते वानखेडेंवर नवनवीन आरोप करत आहेत. त्यानंतर आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ''इंटरवलच्या नंतर आपण बोलू. पण अजून इंटरवल झालेला नाही'' असं म्हटलयं.

samir wankhede
''माझे वडील हिंदू, तर आई...'' मलिकांच्या आरोपानंतर समीर वानखेडेंचा खुलासा

एनसीबीचा संघर्ष हा नवाब मलिक विरुद्ध एक अधिकारी असा नाही. नवाब मलिक हे कॅबिनेट मंत्री आहेत. कॅबिनेट मंत्री बोलतो तेव्हा तो व्यक्ती नसतो तर ते सरकार म्हणतं. कुठलीही केंद्रीय तपास यंत्रणा त्यात गैरवापर करून महाराष्ट्रात काही बेकायदेशीर कृत करत असेल त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

'चौकशी होईपर्यंत समीर वानखेडेंना पदावर राहण्याचा अधिकार नाही' -

राज्याचे मुख्यमंत्री असेल किंवा गृहमंत्री असतील प्रत्येकाल वाटतं की राज्यात कुठलीही बेकायदेशीर कारवाई होऊ नये. ज्या प्रकारचे पुरावे आणि सत्य समोर आले आहे. त्यावरून राज्य सरकारने त्याची चौकशी स्वतंत्रपणे करायला पाहिजे. ही चौकशी होईपर्यंत संबंधित अधिकारी त्या पदावर राहता कामा नये, असेही संजय राऊत म्हणाले.

...तर २०२४ ला मालक बदलतील -

विरोधक काहीही बोलतात. त्यांना आम्ही गांभीर्याने घेत नाही. ही राजकीय पक्षांची लढाई नाही. एक कारवाई झाली आहे. त्यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणारे काही पुरावे समोर आले आहेत. त्यामध्ये राजकीय काहीही नाही. केंद्रीय यंत्रणा महाविकास आघाडीचे नेते, मंत्री यांना फरफटत घेऊन जातात, बदनाम करतात ते विरोधकांना मान्य आहे का? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला. तपास यंत्रणा या सरकारी आहेत. त्याचे तुम्ही मालक नाहीत हे लक्षात ठेवा. मालक असल्यासारखे वागू नका आणि बोलू नका. तुम्हाला वाटत असेल तर २०२४ ला मालक बदलतील, असा इशाराही राऊतांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com