Samrudhi Expressway Accident: समृद्धी अपघातप्रकरणी दोन सहाय्यक निरीक्षक निलंबित !

Samrudhi Expressway Accident: समृद्धी अपघातप्रकरणी दोन सहाय्यक निरीक्षक निलंबित !

Samrudhi Expressway: समृद्धी महामार्गावर रविवारी (ता. १५) झालेल्या ट्रक आणि ट्रॅव्हलरच्या अपघातात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. या प्रकरणात औरंगाबादच्या दोन सहायक मोटार वाहन निरीक्षकांसह ट्रकचालकावर गुन्हा दाखल करून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. दोन्ही निरीक्षकांना रविवारीच तडकाफडकी परिवहन आयुक्तांनी निलंबित केले. अपघाताची कारणमीमांसा तपासण्याच्या दृष्टीने थर्ड पार्टी अहवाल मागण्यात आला आहे. त्याचे काम सेव्ह लाईफ फाऊंडेशनला देण्यात आले आहे.

परिवहन विभागाकडून महामार्गावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांच्या क्रमांकाची फक्त नोंद करण्याच्या सूचना असताना ट्रक थांबवण्याचे कारण काय, कोणत्या अधिकाऱ्याने असे आदेश दिले होते, या दिशेनेसुद्धा तपास सुरू असल्याचे अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी सांगितले.

परिवहन विभागाने सांगितल्याप्रमाणे महामार्ग, द्रुतगती महामार्गांवर वाहन कुठेही थांबवता येत नाही. टोलनाक्यांवर चालकांचे समुपदेशन करण्याचे धोरण आहे.

समृद्धी महामार्गावर रविवारी झालेल्या अपघाताचे स्थळ गंगापूरच्या सहा किलोमीटर आधीचे आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सहायक मोटार वाहन निरीक्षक कोणाच्या आदेशाने महामार्गावर वाहन थांबवून कारवाई करत होते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याशिवाय भरारी पथकामध्ये कारवाई करताना वरिष्ठ अधिकारी म्हणजेच मोटार वाहन निरीक्षक असणे अनिवार्य आहे; मात्र या प्रकरणात दोन सहायक मोटार वाहन निरीक्षक महामार्गावर वाहन थांबवून कारवाई करत असल्याने या घटनेबाबत अनेक शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत. या प्रकरणामुळे परिवहन विभागातील अंतर्गत कार्यप्रणालीवरसुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Samrudhi Expressway Accident: समृद्धी अपघातप्रकरणी दोन सहाय्यक निरीक्षक निलंबित !
Samruddhi Highway Accident Case: राजीवनगरवर शोककळा, चौघांच्या मृत्यूने हळहळ

समृद्धी महामार्गावर रविवारी झालेल्या अपघातात पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरला आहे. पंतप्रधान यांच्यासह राज्यातील प्रत्येक मोठ्या नेत्याने शोक व्यक्त केला आहे. त्याशिवाय राज्य मानवाधिकार आयोगानेसुद्धा सुमोटो दखल घेत परिवहन विभागाकडे अपघातासंबंधी अहवाल मागितला आहे.

राज्यभरात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्याप्रमाणे रविवारी झालेल्या अपघातासंबंधी अहवाल औरंगाबाद रस्ता सुरक्षा समितीकडूनही मागण्यात येणार असल्याचे परिवहन विभागाने सांगितले.

केंद्रीय मोटार वाहन कायद्याप्रमाणे वायुवेग पथकाचे प्रमुख मोटार वाहन निरीक्षक असतात. अपघातावेळी मोटार वाहन निरीक्षक कर्तव्यावर गैरहजर होते. हजर असलेले वायुवेग पथकाचे सहायक मोटार वाहन निरीक्षक विनाअनुभवी आहेत. त्यामुळे औरंगाबाद प्रादेशिक परिवहन अधिकारी व वायुवेग पथकाचे प्रमुख मोटार वाहन निरीक्षकांवरही जबाबदारी निश्चित करून त्यांना आरोपी करून त्यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी शिवसेना शिव वाहतूक सेनेचे जळगाव जिल्हा माजी अध्यक्ष सुलतान बेग नजीर बेग मिर्झा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन प्रधान सचिव, परिवहन आयुक्त आणि औरंगाबाद जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

Samrudhi Expressway Accident: समृद्धी अपघातप्रकरणी दोन सहाय्यक निरीक्षक निलंबित !
Sam Bahadur: भारतीय सेनेचा गणवेश परिधान करताना कसं वाटलं? विकी कौशल म्हणाला...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com