सांगोला पुन्हा हादरले! जादुटोणा केल्याने कुटुंबाची प्रगती होईना म्हणून भाच्याने केला आत्याचा खून; मोबाइलशिवाय पळालेल्या आरोपीला पोलिसांनी अक्कलकोटमध्ये पकडले

शिरभावी (ता. सांगोला) गावालगत असलेल्या वन ‍विभागाच्या जागेत ११ मार्च रोजी रात्री सातच्या सुमारास ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. दगडाने व धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केला होता. सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीचा शोध सुरु केला. मयत महिलेचा भाचा विजय दत्ता खेंडकर हाच मारेकरी निघाला.
sangola crime
sangola crimesakal

सोलापूर : शिरभावी (ता. सांगोला) गावालगत असलेल्या वन ‍विभागाच्या जागेत ११ मार्च रोजी रात्री सातच्या सुमारास ६० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. दगडाने व धारदार शस्त्राने वार करुन तिचा खून केला होता. सांगोला पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपीचा शोध सुरु केला. मयत महिलेचा भाचा विजय दत्ता खेंडकर हाच मारेकरी निघाला. पोलिसांनी त्याला जेरबंद केले असून त्याला न्यायालयाने १९ मार्चपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे. काही दिवसांपूर्वी तालुक्यातील एका युवकाने रेशनकार्डच्या कारणातून आई-वडिलांचाच खून केला होता. आता काही दिवसांनी हा गुन्हा समोर आल्याने सांगोला तालुका पुन्हा चर्चेत आला आहे.

वृद्ध महिलेच्या खुनानंतर पोलिसांनी मयत महिलेची ओळख पटवली. मयत व्दारका बबन माने असल्याची खात्री झाली. दोन मुलांसमवेत ती धायटीत राहायला होती. ११ मार्च रोजी ती त्याच परिसरातील तिच्या भावाकडे गेली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याअनुषंगाने तपासाची चक्रे फिरविली. तिच्या मृत्युनंतर सख्या भावाचे व त्याच्या मुलांचे वर्तन संशयास्पद वाटले. मयताचा भाचा गुन्हा घडल्यापासून अस्तित्व लपवून राहत असल्याचेही समजले. गुन्ह्यातील संशयीत आरोपीचा पोलिसांकडून सुरुच होता. याशिवाय पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट येथील गोपनिय बातमीदारही कामाला लावले होते.

गुरुवारी (ता. १४) संशयित आरोपी अक्कलकोट मंदिर परिसरात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले. ही कामगिरी सहायक पोलिस ‍निरीक्षक धनंजय पोरे, उपनिरीक्षक सुरज निंबाळकर यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक राजेश गायकवाड, सहायक फौजदार श्रीकांत गायकवाड, पोलिस हवालदार सलीम बागवान, हरिदास पांढरे, विजयकुमार भरले, पोलिस नाईक धनराज गायकवाड, यश देवकते, समर्थ गाजरे, तसेच अक्कलकोट पोलिस ठाण्याचे महादेव चिंचोळकर, प्रमोद शिंपाळे, सचिन गायकवाड यांनी बाजवली.

जादुटोण्यामुळे कुटुंबाची प्रगती होत नसल्याचा राग

संशयित आरोपी विजय खेंडकर याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला. त्यावेळी आत्या व्दारका माने ही माझ्यावर आणि कुंटुबावर जादुटोणा करीत होती व त्यामुळे आपल्या कुंटुबाची काही प्रगती होत नव्हती म्हणून त्या रागातून शिरभावी गावाजवळील वन ‍विभागाच्या जागेत नेऊन तिचा चाकुने वार करुन व दगडाने डोके ठेचून खून केल्याची कबुली त्याने दिली.

मोबाइल वापरत नव्हता, तरी पकडलाच

वृद्ध आत्याचा खून करून अक्कलकोट याठिकाणी लपलेल्या विजय खेंडकर याच्याकडे मोबाइल देखील नव्हता. त्यामुळे पोलिसांसमोर त्याला शोधण्याचे मोठे आव्हान होते. पण, त्याने पैशासाठी एकाला फोन केला आणि त्याचे लोकेशन काढून गुन्हे शाखेचे धडाकेबाज अधिकारी धनंजय पोरे व सुरेश निंबाळकर यांचे पथक त्याच्यापर्यंत पोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com