
मुंबई : अनिल परब यांच्या घरी आज सकाळी ईडीने छापे टाकले आहेत. त्यांच्या शासकीय निवासस्थानासोबत त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणावर छापे टाकण्यात आले आहेत. त्यानंतर अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्या घरीही ईडीने छापा टाकला आहे.
(ED Raid On Anil Parab)
अंधेरी पश्चिम येथील विधानसभेचे शिवसेना संघटक संजय कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्या घरी सकाळीपासून ईडीचे अधिकारी पोहोचले असून त्या ठिकाणी शिवसैनिकांनी जमा व्हायला सुरूवात झाल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान याअगोदरही अनिल परब यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकले होते. त्यावेळी कदम यांच्या घरी त्यांना मोठा मुद्देमाल हाती लागला होता. त्यानंतर आता दोन महिन्यांनी ईडीने छापा टाकला आहे.
दरम्यान किरीट सोमय्या यांनी केंद्रात अनिल परब यांच्याविरोधात तक्रार केली होती. सचिन वाझे आणि १०० कोटींच्या प्रकरणातही अनिल परब यांचं नाव समोर आलं होत. मनी लॉंडरिंग प्रकरणातील ईडीच्या या कारवाईनंतर परब यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
अनिल देशमुख यांच्या 100 कोटींच्या वसुली प्रकरणात ईडीकडून ही छापेमारी सुरू असल्याचं बोललं जात आहे. पोलीस खात्यात बदल्यांचं रॅकेट अनिल परब यांच्यामार्फत सुरू असल्याचा संशय यंत्रणांना आहे. याआधी किरीट सोमय्या यांनी परबांवर परिवहन खात्यात पैशांची अफरातफर केल्याचा आरोप केला होता. परिवहन खात्यातीत अधिकारी बजरंग खरमाटे ही व्यक्ती परबांचा वाझे असल्याचा आरोपही झाला होता.
तसेच अनिल परब यांच्यावर सुमारे 50 कंत्राटदारांकडून कोट्यवधी रुपयांची वसुली केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्यामुळे ईडीकडून ही कारवाई करण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.