भुजबळांच्या पक्षप्रवेशावर अखेर शिवसेनेकडून स्पष्टीकरण...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 सप्टेंबर 2019

संजय राऊत म्हणाले की, सध्या राज्यातील राजकारणाचं उत्तर महाराष्ट्र हा केंद्र बिंदू आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी आज चर्चा झाली. मी आहे तिथे बरं आहे. असं छगन भुजबळ यांनी स्वतः म्हटले असल्याचे त्यांनी राऊत यांनी सांगितले आहे.

मुंबई : अनेक दिवसांपासून महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करून घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना वेग आलेला असतानाच भुजबळांच्या प्रवेशावर शिवेसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी प्रतिक्रीया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, सध्या राज्यातील राजकारणाचं उत्तर महाराष्ट्र हा केंद्र बिंदू आहे. उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांशी आज चर्चा झाली. मी आहे तिथे बरं आहे. असं छगन भुजबळ यांनी स्वतः म्हटले असल्याचे त्यांनी राऊत यांनी सांगितले आहे.

राजे भाजपमध्ये जाऊ नका; राजू शेट्टींना उत्तर देत राजे म्हणाले...

राऊत पुढे म्हणाले की,  त्यामुळे चित्र स्पष्ट आहे. आमच्याकडे काही वॉशिंग मशीन नाही, सगळ्यांना पक्षात घायला. आम्ही पारखून नेत्यांना पक्षप्रवेश देत आहोत. त्यामुळे छगन भुजबळ यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या आशा धुसर झालेल्या दिसून येत आहेत.

मंदीची जबाबदारी भाजपचीच : संजय राऊत

भुजबळ यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. मात्र, यावर शिवसेना किंवा स्वत: छगन भुजबळ यांच्याकडून मात्र शिक्कामोर्तब करण्यात आलेलं नाही. अशातच आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी भुजबळांच्या शिवसेना प्रवेशावर भाष्य करत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanjay raut clarifies about chagan bhujbal entry in shivsena